7th Pay Commission Breaking : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ गेल्या काही दिवसांपासून लांबत चालली आहे. नवीन वर्ष सुरु होऊन जवळपास आता ३ महिने संपणार आहेत तरीही कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत केन दर सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक केंद्र सरकारच्या DA वाढीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत. मात्र आता लवकरच कर्मचाऱ्यांना मोठी बातमी मिळणार आहे.
आता वाघ्या काही तासांतच केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी दिली जाऊ शकते. केंद्र सरकाकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ केल्याची घोषणा केली जाणायची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२४ मार्च २०२३ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये सरकारकडून कर्मचाऱ्यांची DA केली जाण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होईल तसेच पेन्शनधारकांना देखील मोठा फायदा होईल.
१ मार्च २०२३ रोजी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये महागाई भत्ता वाढीची मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. मात्र सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्के आहे. पण आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे येत्या काळात कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के होऊ शकतो.
महागाई भत्ता वाढ झाल्यानंतर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे. कारण कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. तर पेन्शनधारकांना देखील मोठा लाभ होणार आहे.
लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे
देशातील लाखो कर्मचारी याची आतुरतेने वाट पाहत आहेत. याचा फायदा ६५ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ४८ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. यानंतर 1 जुलै 2023 रोजी पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ होणार आहे.