7th Pay Commission:- केंद्र सरकार वर्षातून दोनदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करत असते. अलीकडच्या काही दिवसा अगोदरच केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली.
या अगोदर कर्मचाऱ्यांना 42 टक्के इतक्या दराने महागाई भत्ता मिळत होता व आता या चार टक्के वाढीसह तो 46 टक्के इतका करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून जानेवारी आणि जुलै या कालावधीमध्ये दोनदा महागाई भत्त्यात वाढ केली जाते.
एआयसीपीआय निर्देशांक आणि सातवा वेतन आयोगाच्या तरतुदी या माध्यमातून महागाई भत्त्यात सरकारच्या माध्यमातून वाढ करण्यात येते. याच अनुषंगाने आता येणाऱ्या नवीन वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून परत एकदा महागाई भत्त्यात वाढ केली जाण्याची शक्यता असून जर असे झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही नवीन वर्षाची अनोखी भेट ठरणार आहे.
नवीन वर्षात महागाई भत्त्यात सरकार करू शकते वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीसोबतच केंद्र सरकारच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई सवलतीत देखील वाढ केली जाते. महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये करण्यात आलेल्या वाढीचा थेट परिणाम हा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि निवृत्तीवेतनधारकांच्या पेन्शनवर होत असतो.
सध्या जर आपण पाहिले तर सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना 46 टक्के महागाई भत्ता व महागाई सवलत दिली जात आहे. सरकारने आणखीन नवीन वर्षामध्ये यात चार टक्क्यांची वाढ केली तर 46 टक्क्यांवरून ही वाढ 50 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये किती होईल वाढ?
केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असल्याने महागाई भत्ता आणि महागाई सवलत 50 टक्क्यांपर्यंत वाढेल. साहजिकच याचा थेट परिणाम हा कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांच्या अनुक्रमे वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ होण्यावर होणार आहे.
साधारणपणे जर 50% महागाई भत्ता वाढला तर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनामध्ये नऊ हजार रुपयांची वाढ होईल. साधारणपणे जानेवारी आणि फेब्रुवारी किंवा मार्च या कालावधी दरम्यान सरकार ही वाढ करू शकते. यासंबंधी जर आपण सातवा वेतन आयोगाचा विचार केला तर 2016 मध्ये सरकारच्या माध्यमातून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला होता व तेव्हा महागाई भत्ता शून्य करण्यात आला होता.
जर आपण याबाबतचा नियम पाहिला तर महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत जेव्हा पोहोचतो तेव्हा तो शून्यावर आणला जातो व 50 टक्के वाढीने मिळणारा जो काही महागाई भत्ता असतो तो कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये जोडला जातो. त्यामुळे जेव्हा महागाई भत्ता 50 टक्क्यांवर जाईल तेव्हा मूळ वेतनात देखील वाढ होईल.समजा यामध्ये जर एखाद्या कर्मचार्यांची बेसिक सॅलरी 18 हजार रुपये असेल तर त्यामध्ये नऊ हजार रुपयांची भर पडेल. त्यानंतर मात्र स्वतंत्रपणे महागाई भत्ता दिला जाणार आहे.