भारत

Gold Price Update : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! सोने 3200 तर चांदी 18000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किमती

Gold Price Update : देशात सध्या लग्नसराई सुरु होत आहे. या दिवसांमध्ये अनेकजण सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करत असतात. त्यामुळे सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ होते. जर तुम्हीही सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. 3200 रुपये प्रति 10 ग्रॅम सोने स्वस्त होत आहे. तर चांदी 18000 प्रति किलोपेक्षा स्वस्त दराने विकली जात आहे.

सोने आणि चांदी कमी किमतीमध्ये खरेदी करण्याची ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे. सध्या सोने 56000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 62000 रुपये प्रति किलो या दराने विकली जात आहे.

शनिवार रविवारी दर जाहीर होत नाहीत

शनिवारी आणि रविवारी सोन्या चांदीचे दर जाहीर होत नाहीत. सुट्टी असल्यामुळे सोमवारी हे दर जाहीर केले जातात. आज पुन्हा एकदा सोने आणि चांदीचे दर जाहीर केले जाणार आहेत. मागील आठवड्यच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या किमतीमध्ये थोडीशी वाढ झाली होती.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर

शुक्रवारी सोन्याच्या दरात किरकोळ वाढ पाहायला मिळाली. तसेच शनिवारी आणि रविवारी सोन्या चांदीचे दर जाहीर होत नाहीत. 24 कॅरेट सोने 383 रुपयांनी महागून 55669 रुपये झाले, 23 कॅरेट सोने 381 रुपयांनी महागून 55446 रुपये झाले,

22 कॅरेट सोने 356 रुपयांनी महाग होऊन 50993 रुपये झाले, 18 कॅरेट सोने 287 रुपयांनी वाढून 41752 रुपये झाले आणि 14 कॅरेट सोने 287 रुपयांनी महाग होऊन 32566 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले.

सोने 3200 रुपयांनी तर चांदी 18000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे

गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याची किंमत उच्चांकापर्यंत पोहोचली होती मात्र सध्या त्यामध्ये घसरण झाली आहे. सध्या सोने त्यांच्या उच्चांक किमतीपासून 3200 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. 2 फेब्रुवारी 2022 सोन्याने उच्चांक गाठला होता. यावेळी सोन्याची किंमत 58882 रुपये होती.

चांदी अजूनही त्याच्या उच्चांक किमतीपासून 18189 रुपये प्रति किलो स्वस्त मिळत आहे. चांदीची आतापर्यंत उच्चांक किंमत 79980 रुपये होती. सध्या लग्नसराई सुरु झाली आहे त्यामुळे लवकरच सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ होऊन दरही वाढू शकतात.

मिस्ड कॉल देऊन सोन्याची नवीनतम किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊन नवीन दर जाणून घेऊ शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts