भारत

Ration Card Rules : रेशनकार्ड धारकांना मोठा धक्का ! सरकारने केला नियमात बदल, आता मिळणार नाही धान्य

Ration Card Rules : जर तुम्ही रेशनकार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आहे. कारण सरकारने शिधापत्रिकेसंबधित एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सरकारच्या या नवीन नियमामुळे लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही. सरकारने हा निर्णय का घेतला त्याचा कितपत फटका लाभार्थ्यांना बसू शकतो ते सविस्तर जाणून घेऊयात.

नवीन नियमामुळे तांदूळ मिळणार कमी

सरकारने आता रेशन कार्डचे काही नियम बदलले आहेत. त्यामुळे तांदूळ कमी मिळणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे आतापासून राज्यातील लाखो लाभार्थ्यांना पूर्वीपेक्षा 1 किलो कमी तांदूळ मिळणार आहे. तेलंगणा सरकारने हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. तांदूळ वितरणाचे प्रमाण कमी करण्यात आल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.

काढून टाकली लाभार्थ्यांची नावे

तसेच आता हरियाणा सरकारने लाभार्थ्यांसाठी एक नवीन टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. राज्यातील बऱ्याच लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेतून काढून टाकली आहेत, सरकारच्या या निर्णयामुळे आता लाभार्थ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांची नावे चुकीच्या पद्धतीने कापली गेली आहेत किंवा त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी दोन क्रमांक जारी केले आहेत.

हा आहे टोल फ्री क्रमांक

याबाबत हरियाणा सरकारने 1967 आणि 1800 180 287 हे दोन टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. यावर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. या क्रमांकांवर तक्रारी नोंदवून तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

इतका येणार खर्च

केंद्र सरकारकडून गरिब जनतेच्या समस्या लक्षात घेऊन विशेष सुविधा सुरू केली आहे. अन्न अनुदानाच्या रूपात, सरकार या वर्षात म्हणजे 2023 मध्ये 2 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहे. ज्यामुळे देशातील गरीब आणि इतर घटकांना अन्नाची चिंता करावी लागणार नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts