Aadhaar Card Loan : देशात आधार कार्ड हा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. आपल्याला आधार कार्डच्या मदतीने केंद्र आणि राज्य सरकार राबवत असणाऱ्या अनेक योजनांचा फायदा घेता येतो. मात्र मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या आधार कार्ड संबंधीत एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये केंद्र सरकार आधार कार्ड असणाऱ्या नागरिकांना तब्बल 4,78,000 रुपयांचे कर्ज देत असल्याची माहिती देण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्या सोशल मीडियावर देखील हा मेसेज आला असल्यास सावधान व्हा कारण केंद्र सरकारने या मेसेजबद्दल मोठा अपडेट दिला आहे जे जाणून घेणे तुमच्यासाठी खूपच महत्वाचे आहे नाहीतर तुमचा मोठा नुकसान देखील होऊ शकते.
व्हायरल मेसेजचे सत्य काय?
पीआयबी फॅक्ट चेक, सरकारच्या तथ्य तपासणी संस्थेने या दाव्याची चौकशी केली आणि हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आढळले. पीआयबी फॅक्ट चेकच्या वतीने अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले गेले आणि असे सांगण्यात आले की सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये दावा केला जात आहे की केंद्र सरकार सर्व आधार कार्ड धारकांना 4,78,000 रुपये कर्ज देत आहे.
हा दावा पूर्णपणे खोटा
पीआयबी फॅक्ट चेकने सांगितले की हा दावा पूर्णपणे खोटा आहे. ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की, हा फसवणुकीचा प्रयत्न असू शकतो आणि तुमची वैयक्तिक/आर्थिक माहिती कोणाशीही शेअर करू नका. सरकारने आपले वैयक्तिक तपशील शेअर करू नका असे आवाहन केले आहे.
पीआयबी तथ्य तपासणी म्हणजे काय?
PIB फॅक्ट चेक सोशल मीडियावर व्हायरल झालेले बनावट मेसेज किंवा पोस्ट समोर आणते आणि त्यांचे खंडन करते. हे सरकारी धोरणे आणि योजनांबद्दल चुकीच्या माहितीचे सत्य समोर आणते. तुम्हालाही कोणत्याही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या मोबाईल क्रमांक 918799711259 किंवा socialmedia@pib.gov.in वर मेल करू शकता.
हे पण वाचा :- Jeevan Mangal Policy: भारीच .. ‘ही’ पॉलिसी देणार तुम्हाला सुरक्षिततेची हमी ! जाणून घ्या केव्हा आणि कशी गुंतवणूक करावी