Aadhaar Card Update: आज देशात लागू असणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. याच बरोबर इतर सरकारी कामासाठी देखील आधार कार्ड आवश्यक करण्यात आला आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो आज देशातील सरकारी किंवा निम्म सरकारी कामे करण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. यामुळे आधार कार्ड अपडेट ठेवणे खूपच महत्वाचे आहे. यातच आता देशातील करोडो नागरिकांना दिलासा देत UIDAI म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे.
या घोषणेनुसार आता 14 जूनपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट केले जाऊ शकते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या कामासाठी 50 रुपये फी लागते मात्र आता या घोषणेनंतर पुढील 3 महिन्यांसाठी हे काम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटद्वारे फ्रीमध्ये होणार आहे.
हे लक्षात ठेवा कि ही प्रक्रिया केवळ डेमोग्राफिक्स डिटेल्स अपडेट करण्यासाठी उपलब्ध आहे. तुम्हाला फोन नंबर किंवा बायोमेट्रिक डिटेल्स अपडेट करायचे असल्यास, तुम्हाला आधार नोंदणी केंद्रावर जावे लागेल आणि फी भरून ते अपडेट करावे लागतील. जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख इत्यादी माहिती अपडेट करायची असेल, तर आम्ही तुम्हाला खाली स्टेप्स सांगत आहोत जे तुम्ही फॉलो करू शकतात.
सर्वप्रथम, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in/ वर जावे लागेल.
होमपेजवरील MyAadhaar टॅबवर क्लिक करा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून Update Your Aadhaar वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला अपडेट आधार तपशील ऑनलाइन पेजवर रीडायरेक्ट केले जाईल.
येथे तुम्हाला Proceed To Update Aadhaar वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक पुढील पानावर लिहावा लागेल आणि कॅप्चा टाकावा लागेल.
यानंतर तुम्हाला OTP पाठवावा लागेल.
OTP प्रविष्ट करा आणि नंतर लॉगिन बटणावर क्लिक करा.
त्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला तुमचे डेमोग्राफिक्स डिटेल्स अपडेट करण्यासाठी वेगवेगळे पर्याय दिसतील.
मग तुम्हाला यापैकी कोणतीही एक निवडायची आहे.
तुम्हाला काय अपडेट करायचे आहे ते बदलल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
त्यानंतर तुम्हाला सबमिट अपडेट रिक्वेस्टवर टॅप करावे लागेल.
विनंती सबमिट केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल.
तुमच्या अपडेट रिक्वेस्ट स्टेटस ट्रक करण्यासाठी तुम्ही हे URN वापरू शकता.
स्टेटस तपासण्यासाठी myaadhaar.uidai.gov.in/ वर जा आणि चेक एनरोलमेंट आणि अपडेट स्टेटस वर क्लिक करा.
तुमचा URN नंबर आणि कॅप्चा एंटर करा. स्टेटस तुमच्या समोर येईल
हे पण वाचा :- Home Loan : खुशखबर ! आता होणार स्वप्न पूर्ण ; ‘या’ बँका देत आहे स्वस्तात होम लोन