नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या ‘आम आदमी पक्षा’च्या आमदारावर गोळीबाराची घटना घडली आहे. मेहरुलीचे आमदार नरेश यादव यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर गोळ्या झाडण्यात आला.
या घटनेतून यादव बालंबाल बचावले असले, तरी ‘आप’चा कार्यकर्ता मृत्युमुखी पडला आहे. ‘आप’चे आमदार नरेश यादव आणि कार्यकर्ते मंदिरातून परत येत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
गोळीबारात जखमी झालेल्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याचं निधन झालं, तर एक जण जखमी झाला” असं ट्वीट पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन केलं आहे. ‘आप’चे आमदार नरेश यादव यांच्यावरील हल्ल्यात कार्यकर्ते अशोक मान यांचे निधन झाले आहे. आज आम्ही आमच्या कुटुंबातील एक सदस्य गमावला आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो’ असंही पुढे ट्वीटमध्ये म्हटलं आहे.