अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-अमेरिकन बिझिनेस मॅगझिन फोर्ब्सने नुकतीच 2020 मध्ये जगातील 100 सर्वाधिक कमाई करणार्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली.
या यादीत अक्षय कुमार हा एकमेव भारतीय असून 52 व्या क्रमांकावर आहे.
अक्षयच्या कमाईवर कोरोनाचाही परिणाम झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्याचे उत्पन्न 88 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. असे असूनही, तो जॅकी चॅन आणि जेनिफर लोपेझ सारख्या कलाकारांपेक्षा पुढे आहे. 2019 मध्ये त्यांची कमाई ( 444 कोटी रुपये) होती, जी यंदा कमी होऊन 48.5 मिलियन डॉलर (अंदाजे 356 कोटी रुपये) झाली आहे.
मागील वर्षी अक्षय या यादीमध्ये 51 व्या स्थानावर होता आणि 2018 मध्ये 270 कोटींची कमाई करुन 76 व्या स्थानावर होता.
100 कोटी कमाईची अपेक्षा आहे :- या मासिकाच्या म्हणण्यानुसार अक्षयच्या कमाईचे मुख्य स्रोत चित्रपट आहेत.
रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले आहे की तो एक बँकेबल स्टार आहे आणि ‘बच्चन पांडे’ आणि ‘बेल बॉटम’ सारख्या आगामी चित्रपटातून सुमारे 13 मिलियन डॉलर्स (सुमारे 95 कोटी रुपये) मिळवणार आहे.
काइली जेनर सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रिटी :- या यादीनुसार, अमेरिकन मीडिया व्यक्तिमत्व, मॉडेल आणि बिजनेस वुमन काइली जेनर जगातील सर्वाधिक कमाई करणारी सेलिब्रिटी आहे. एका वर्षात त्याने सुमारे 590 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 4340 कोटी रुपये) कमावले आहेत.