Jyotish Tips : आजही अनेकजण ज्योतिषशास्त्रानुसार पूजा पाठ करत असतात. मात्र काही वेळा चुकीच्या सवयीमुळे घरात दारिद्र्य येते. लक्ष्मी माता घरात थांबत नाही. जर तुम्हालाही तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा वास हवा असेल तर काही ज्योतिषशास्त्रानुसार उपाय करावे लागतील.
घरात ठेवल्या जाणारी काही वस्तू ज्योतिषशास्त्रानुसार ठेवल्या पाहिजेत. अन्यथा काही वेळा चुकीच्या पद्धतीने ठेवलेल्या वस्तू तुमच्या नशिबी दारिद्र्य आणू शकते.
ज्योतिषशास्त्रात शंख पवित्र मानला जातो
ज्योतिषशास्त्रात शंखाला पवित्र मानले जाते. कोणतीही पूजा पाठ, किंवा धार्मिक विधी करत असताना शंख फुंकणे गरजचे आहे. यामागे अनेक पौराणिक समजुती आहेत.
विष्णु पुराणानुसार, प्राचीन काळी देव आणि दानवांनी मिळून अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथन केले होते. या मंथनात भगवान विष्णूने कासवाच्या रूपात मंदार पर्वत धारण केला होता.
वासुकी नागाला दोरी बनवण्यात आली होती, ज्याला एका बाजूला देवतांनी मंथन केले होते आणि दुसऱ्या बाजूला राक्षसांनी. समुद्रमंथनादरम्यान 14 अमूल्य रत्ने प्राप्त झाली, त्यापैकी एक शंख देखील होता. यामुळेच शंख अत्यंत पवित्र मानला जातो.
घरात शंख ठेवण्याचे उपाय
घरात शंख ठेवण्याने सुख शांती लाभेल. तसेच हा शंख ज्या ठिकाणी देवाची पूजा केली जाते अशा ठिकाणी ठेवावा. शंख आणताच नकारात्क नकारात्मक ऊर्जा संपेल आणि माता लक्ष्मीची कृपा होईल.
घरात ठेवलेला शंख रोज वाजवावा. यामुळे घरात वातावरण चांगले होईल. तसेच वाईट काळ तुमच्यापर्यंत येणार नाही. तुम्हाला सर्व ठिकाणी यश मिळेल आणि तुम्ही भगवान बनाल.
पूजेपूर्वी शंख पाण्याने भरावा. याच शंखाने देवाची पूजा करा. शेवटी, पूजेला उपस्थित असलेल्या सर्व लोकांवर आणि घराच्या सर्व भागात शंख पाणी शिंपडा. यामुळे सर्व वास्तुदोष दूर होतात. घरात शांतता नांदते आणि कुटुंबाचे एकूण उत्पन्नही अनेक पटींनी वाढते.