Chanakya Niti : लग्नापूर्वी अनेकांचे प्रेमसंबंध असतात. मात्र काही चुका हे प्रेमसंबंध संपुष्टात आणू शकतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथात सांगितलेल्या या चुका कधीही प्रेमसंबंधात शेअर करू नका अन्यथा तुमच्या नात्यात दुरावा येईल.
स्त्री आणि पुरुषांना जीवनात सुखी राहायचे असेल तर त्यांना चाणक्य नीती या ग्रंथाचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. यामध्ये वैवाहिक जीवनात कसे सुखी राहायचे याबद्दलही सांगण्यात आले आहे.
तसेच लोकांचे लग्नाअगोदर प्रेमसंबंध असतात असे लोक नात्यात दुरावा येईल अशा अनेक चुका करत असतात. मात्र चाणक्यांनी अशा चुका सांगितल्या आहेत ज्या तुम्हाला माहिती झाल्यावर कदापिही तुम्ही करणार नाही.
आचार्य चाणक्य यांची धोरणे नेहमी मानवाला संकटातून बाहेर पडण्यास मदत करतात. तसेच जर जीवनात सफल होईचे देखील मार्ग आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये सांगितले आहेत.
आचार्य चाणक्य म्हणतात की लग्नापूर्वी स्त्री आणि पुरुष दोघांनी पैशाशी संबंधित सर्व माहिती गुप्त ठेवावी. जर तुम्ही या नात्यातील तुमच्या खर्या कमाईबद्दल सांगितले असेल, तर तुमचे कमी उत्पन्न असेल तर मुलगी तुमच्याशी संबंध तोडण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक वाईट गोष्टी टाळा
जर तुमचे लग्न जमले असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अनेक गोष्टी बोलण्याचे टाळले पाहिजे. तुम्ही कधीही एकमेकांशी वाईट बोलू नका. जर तुम्ही चुकूनही वाईट बोलला तर तुमचे नटे तुटू शकते. तसेच एकमेकांबर भांडू नका. एकमेकांच्या कुटुंबाचा आदर ठेवा.
आंधळेपणाने विश्वास ठेवू नका
लग्नाआधी एकमेकांना जाणून घेणे गरजचे असते. त्यासाठी दोघांचा संवाद होणे महतवाचे आहे. मात्र संवाद साधत असताना कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. जर तुम्ही एकमेकांना न जाणून घेता विश्वास ठेवला तर तुमची फसवणूक होऊ शकते.
आपले दु:ख सामायिक करू नका
आचार्य चाणक्य म्हणतात की या नात्यात चुकूनही आपले दु:ख आणि वेदना शेअर करू नका. कारण ते कच्च्या धाग्यात बांधलेले नाते आहे. अशा परिस्थितीत, जर तुमच्या जोडीदाराला भेटल्यानंतर तुम्ही तिच्यासमोर तुमच्या दु:खाबद्दल रडत बसलात, तर ती आधी तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवेल आणि नंतर तुमच्यापासून दूर जाईल, कारण दुःखी लोकांसोबत कोणालाच संसार करायला आवडत नसते.