भारत

Air Cooler vs Air Conditioner : एसी किंवा कुलर तुमच्यासाठी कोणते आहे बेस्ट? जाणून घ्या दोन्हीचे फायदे आणि तोटे…

Air Cooler vs Air Conditioner : देशात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांना नवीन एसी किंवा कुलर खरेदी करायचा आहे. उष्णतेत वाढ झाल्याने अनेकजण बाजारात एसी आणि कुलर खरेदीसाठी जात आहेत.

पण एसी किंवा कुलर खरेदी करताना कोणते उपकरण फायद्याचे आहे हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे.कारण दोन्ही उपकरणे ही वेगवेगळी आहेत. तसेच त्यांचे फायदे आणि तोटे देखील वेगवेगळे आहेत. त्यामुळे तुम्हाला याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

नवीन एसी किंवा कुलर खरेदी करत असताना तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या बाजूने विचार करणे गरजेचे आहे. कारण तुमच्यासाठी कोणते उपकरण खास ठरू शकते हे समजेल. तसेच कोणते उपकरण तुम्हाला थंड हवा देईल देखील माहिती होईल.

एअर कूलरचे फायदे आणि तोटे काय आहेत

अनेकदा उष्णतेपासून दिलासा मिळवा यासाठी बाजारातून एसी कुलर खरेदी केला जातो. पण हा कुलर पाण्याच्या मदतीने खोलीमध्ये थंडावा निर्माण करत असतो. तसेच खोलीतील उष्णता बाहेर काढण्याचे देखील काम करत असतो. पंख्याच्या मदतीने तसेच पाण्याच्या मदतीने कुलर थंड हवा देत असतो. कुलर खरेदी करण्यासाठी खर्च देखील कमी येत असतो.

एअर कूलरचे फायदे

कुलर हा एसीपेक्षा स्वस्त आहे आणि कमी वीज वापरते.
हवेत आर्द्रता निर्माण करते आणि कोरडे हवामान असलेल्या ठिकाणांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.
खुली दारे आणि खिडक्यांमधून ताजी हवा फिरवत राहते.

एअर कूलरचे तोटे

कुलर हा मोठ्या जागेत थंड हवा देऊ शकत नाही.
वेळोवेळी पाणी बदलणे, कुलर साफ करणे यासारखी अधिक काळजी घ्यावी लागते.
बाहेरील हवा फिल्टर होत नाही जी श्वसनाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते.

एअर कंडिशनरचे फायदे आणि तोटे

एसी खरेदी करताना बजेट देखील जास्त ठेवावे लागते. कारण कुलरच्या तुलनेत एसी खुप महाग असतो. तसेच एसी विजेचा देखील जास्त वापर करते. मात्र कमी वेळात जास्त जागेत थंड हवा एसी देत असतो. घरातील गरम हवा लवकरात लवकर बाहेर काढण्यास एसी मदत करतो.

एअर कंडिशनरचे फायदे

प्रदूषण आणि दुलईत हवा एसी फिल्टर करू शकतो.
अगदी मोठ्या खोलीला त्वरीत थंड करते.
एसी एकदा बसवला की त्याला जास्त खर्च येत नाही मात्र त्याची देखरेख करणे गरजेचे असते.

एअर कंडिशनरचे तोटे

कुलरच्या तुलनेत एसी महाग असतो.
विजेचा वापर जास्त आहे, ज्याचा थेट परिणाम खिशावर होतो.
पर्यावरणासाठी हानिकारक असू शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts