जगामध्ये आणि भारतामध्ये अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी आहेत. जे आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे असून त्यांच्या या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे ते इतर ठिकाणांपेक्षा वेगळे असतात.
म्हणजे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही अशा प्रकारची ठिकाणी जगात आणि भारतात बऱ्याच ठिकाणी आहेत. भारतामध्ये अशा अनेक वास्तू आहेत ज्यांची निर्मिती पुरातन काळी अनेक राजा महाराजांकडून करण्यात आलेली असून त्याकाळचे वास्तु विशारद कला आणि शिल्पकला पाहिली तर व्यक्ती अवाक होते.
आता जर आपण घरांचा विचार केला तर आपण अनेक मोठमोठे घरी पाहिले असतील किंवा गगनचुंबी इमारती आपल्याला मुंबई आणि पुणे सारख्या शहरांमध्ये बघायला मिळतात. परंतु भारतातील गुजरात राज्यात असे घर आहे जे जगातील सर्वात मोठे घर मानले जाते.
या लेखात आपण या घराविषयी महत्वाची माहिती घेणार आहोत. गुजरात राज्यातील बडोदा या ठिकाणी आहे जगातील सर्वात मोठे घर जर आपण जगातील सर्वात मोठ्या खाजगी घराचा विचार केला तर ते भारतातील गुजरात या ठिकाणी असून त्याचे एकूण क्षेत्रफळ तीन कोटी चार लाख 92 हजार वर्ग मीटर असून ते 700 एकर क्षेत्रावर पसरलेले आहे.
बसला ना वाचून धक्का. या घराची निर्मिती गायकवाड या राजघराण्यातील महाराजा सयाजीराव गायकवाड( तिसरे ) यांनी 1890 मध्ये केली. त्याकाळी या घर बांधण्याला जवळजवळ एक लाख 80 हजार पाउंड इतका खर्च आलेला आहे. आज हे घर पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र असून अनेक पर्यटक देखील या ठिकाणी भेट देतात.
या घराचे नाव लक्ष्मी विलास पॅलेस असून मराठा साम्राज्याचे राजवंशज बडोदा येथील गायकवाड घराण्याची ही देणगी आहे. गायकवाड परिवाराचे बडोदा या ठिकाणी राज्य होते. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील राजेशाही पद्धत संपुष्टात आणली गेली. परंतु आज देखील बडोदा येथील नागरिक या परिवाराला शाही परिवार समजतात.
सध्या या गायकवाड घराण्याचे प्रमुख समरजीत सिंह गायकवाड आणि त्यांच्या पत्नी राधिकाराजे गायकवाड हे आहेत. लक्ष्मी विलास पॅलेस हे 700 एकर क्षेत्रावर उभारले गेले असून यामध्ये गार्डन तसेच अनेक आरामदायी सुविधांचा देखील समावेश आहे. लक्ष्मी विलास पॅलेस जेवढ्या क्षेत्रावर उभारले गेले आहे तेवढ्या क्षेत्रावर एक छोटेसे शहर बसवले जाऊ शकते.
या लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये स्वतःचे गोल्फ कोर्स सुद्धा आहे. या पॅलेसच्या दरबार हॉलमध्ये वेनशियन पद्धतीची फरशी असून या फरशीचा इतिहास हा रोम आणि ग्रीस काळाशी जोडलेला आहे.
तसेच या पॅलेस मध्ये एक मोठा बगीचा देखील असून या ठिकाणी राणी शस्त्रागार आणि अनेक प्रकारच्या मूर्तींचा देखील संग्रह आहे. एवढेच नाही तर महाराजा फत्तेसिंह संग्रहालय भवन आणि मोतीबाग पॅलेस देखील याच लक्ष्मी विलास पॅलेस चा एक भाग आहे.
हिंदी सिनेमांची देखील झाली आहे शूटिंग
या ठिकाणी अनेक प्रसिद्ध असलेल्या हिंदी सिनेमांची देखील शूटिंग झालेली आहे. यामध्ये उल्लेखच करायचा झाले तर प्रेम रोग, दिल ही तो है, सरदार गब्बर सिंह, ग्रॅण्ड मस्ती इत्यादी सिनेमांचा समावेश करता येईल.
लक्ष्मी विलास पॅलेसचा पर्यटन स्थळ म्हणून देखील वापर केला जातो.परंतु सध्या त्याचा छोटासा एक भाग पर्यटकांसाठी उघडला असून हा पॅलेस लग्न समारंभासाठी देखील बरेचजण बुक करतात.
लक्ष्मी विलास पॅलेस चे मालक हे समरजीत सिंह गायकवाड असून त्यांना वारसा हक्काने 20000 कोटी रुपयांची संपत्ती मिळालेली आहे. एवढेच नाहीतर प्रसिद्ध राजा रविवर्मा यांच्या अनेक पेंटिंग देखील त्यांना वारसाने मिळालेले आहेत.
एवढेच नाही तर त्यांच्याकडे सोने आणि चांदीच्या दागिन्यांची मोठी संपत्ती असून समरजीत सिंह गायकवाड हे गुजरात आणि वाराणसी या ठिकाणाच्या 17 मंदिर ट्रस्टचे देखील कारभार पाहतात.