Tulsi Direction : हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्व आहे. तसेच प्रत्येकजण तुळशीला पवित्र मानतो. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते. त्यामुळे घराच्या अंगणात स्वच्छ ठिकाणी तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते.
तुळशीचे रोप योग्य दिशेला लावणे गरजेचे अन्यथा ते चुकीच्या ठिकाणी लावल्यानंतर अशुभ मानले जाते. अनेकदा तुळशीचे रोप लावताना दुर्लक्ष केले जाते. मात्र वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप योग्य दिशेला लावणे गरजचे आहे.
तुळशीचे रोप लावल्यानंतर दररोज त्याची पूजा करणे तसेच पाणी घालणे गरजचे असते. योग्य दिशेला तुळशीचे रोप लावल्यानंतर धनलाभ होऊ शकतो असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.
दिशा
घरत किंवा अंगणात तुळस लावणार असला तर ती उत्तर दिशेला लावणे गरजचे आहे. तसेच या दिशेला तुम्हाला रोप लावणे शक्य होत नसेल तर ते ईशान्य दिशेला लावू शकता. यामुळे धनलाभ होईल तसेच घरात सुख शांती देखील लाभेल. योग्य दिशेला तुळशीचे रोप लावल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो असे म्हणतात.
नकारात्मक प्रभाव
तुळशीचे रोप कधीही पूर्व दिशेला लावू नये. कारण त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच व्यवसायात तोटा सहन करावा लागेल. तसेच तुळशीचे रोप दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला लावणे देखील नेहमी टाळले पाहिजे असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे.
छत
आजकाल अनेकजण घराच्या छतावर तुळशीचे रोप लावत असतात. मात्र असे करणे अशुभ मानले जाते. त्यामुळे कधीही तुळशीचे रोप घराच्या छतावर लावू नये. तसेच तुळशीचे रोप पवित्र असते. घराच्या छतावर अनेकदा पक्षी येऊन घाण करतात. अशीही एक मान्यता आहे की घराच्या छतावर तुळशीचे रोप ठेवल्याने उत्तरेकडून मुंग्या बाहेर पडू लागतात.