भारत

Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेसाठी आजपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी सुरु, या दिवसापासून सुरु होणार यात्रा

Amarnath Yatra : दरवर्षी लाखो भाविक अमरनाथ या धार्मिक ठिकाणी भेट देत असतात. पण अमरनाथला जाण्यासाठी तुम्हाला त्या आगोदर नोंदणी करावी लागेल. या वर्षीच्या अमरनाथ यात्रेसाठी आजपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे.

अमरनाथ यात्रा ही मोजकेच दिवस सुरु असते. त्यामुळे या ठिकाणी यात्रा सुरु झाल्यानंतर सतत भाविकांची गर्दी पाहायला मिळते. जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रा ६२ दिवस चालणार आहे. जर तुम्हालाही या यंत्रासाठी जायचे असेल तर तुम्ही देखील नोंदणी करू शकता.

या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये ६२ दिवस अमरनाथ यात्रा चालणार आहे. ही यात्रा यंदा १ जुलैपासून सुरू होणार असून ३१ ऑगस्टला संपणार आहे. या यात्रेसाठी सरकारकडून काही वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. फक्त १३ ते ७० वयोगटातील भाविकच यात्रेसाठी नोंदणी करू शकतात.

जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा म्हणाले की, प्रवास सुरळीत आणि सुलभ व्हावा यासाठी सरकार सर्व प्रकारची व्यवस्था करत आहे. तीर्थयात्रा सुरू होण्यापूर्वी दूरसंचार सेवा अधिक चांगल्या पद्धतीने चालवल्या जातील. अमरनाथ यात्रेकरूंच्या वैद्यकीय उपचारांसाठी उत्तम व्यवस्था करण्यात येत आहे.

जर तुम्हीही या उन्हाळ्यात अमरनाथ यात्रेला केला असेल तर तुम्हाला त्यासाठी नोंदणी करावी लागेल. ऑफलाईन नोंदणी शक्य नसल्याने तुम्ही https://jksasb.nic.in

या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकता.

जर तुम्ही अमरनाथ यात्रा करत असाल तर तुम्हाला सोबत पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखपत्राची झेरॉक्स आणावी लागेल. तसेच तुम्हाला नोंदणी करताना प्रवासाची तारीख आणि प्रवासाचा मार्ग निवडावा लागेल.

ऑनलाइन नोंदणी करताना तुमच्याकडून 220 रुपये प्रति व्यक्ती आकारले जातील. एनआरआय यात्रेकरू PNB द्वारे 1,520 रुपये प्रति व्यक्ती नोंदणी करू शकतात.

अमरनाथ हे हिंदू धर्मीयांसाठी एक पवित्र श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो हिंदू भाविक भेट देत असतात. हम्मु काश्मीरमधील हिमालयाच्या कुशीत एक गुहा आहे. या गुहेत भगवान शिवाने बर्फाचे शिवलिंग बनवले होते, त्याला बाबा बर्फानी असेही म्हणतात. त्यामुळे या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी अनेक श्रद्धाळू या ठिकाणी येत असतात.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts