Apple iPhone 15 Price Leaked : ॲपल कंपनीकडून लवकरच पुढील सिरीज लॉन्च केली जाणार आहे. सध्या बाजारात ॲपल कंपनीचे अनेक फोन धुमाकूळ घालत आहेत. ॲपल फोन्सने ग्राहकांच्या मनावर एक वेगळी छाप उमटवली आहे.
तरुणांना iPhone ने वेड लावले आहे. तरुणांमध्ये या मोबाईल्सची एक वेगळीच क्रेझ आहे. मात्र आता ग्राहक कंपनीच्या पुढील सिरीजची वाट पाहत आहेत. दरवर्षी कंपनीकडून नवीन सिरीज लॉन्च केली जाते.
यावर्षीही कंपनीकडून iPhone 15 सिरीज लॉन्च केली जाऊ शकते. तसेच या फोनमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात येतील अशी आशा सर्वांना आहे. हा फोन लॉन्च होण्यापूर्वीच त्याच्या किमती लीक झाल्या आहेत.
कंपनीकडून iPhone 14 सिरीज मागील वर्षी लॉन्च करण्यात आली आहे. मात्र या फोनची किंमत भारतात जास्त आहे. तसेच यामध्ये वेगवेगळी मॉडेल देखील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
iPhone 14 पेक्षा पुढील सिरीजची किंमत अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे iPhone 15 खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मागील सिरीजपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
किती असणार किंमत
iPhone 15 $799 पासून, iPhone 15 Plus $899 पासून, iPhone 15 Pro $1099 पासून आणि iPhone 15 Ultra $1199 पासून सुरू होईल.
फोर्ब्सने आपल्या अहवालात पुढे स्पष्ट केले की “नवीन लीक किंमती प्रदान करत नाही, परंतु गेल्या आठवड्यात iPhone 15 Pro आणि iPhone 15 Ultra साठी $100 ची किंमत वाढवण्यात आली होती.