भारत

April Bank Holiday 2023: ग्राहकांना धक्का ! एप्रिलमध्ये तब्बल इतक्या दिवस बँका राहणार बंद ; जाणून घ्या नेमकं कारण

April Bank Holiday 2023: नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातच म्हणजे एप्रिल 2023 मध्ये ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल 2023 मध्ये बँकांना बंपर सुट्ट्या असणार आहे यामुळे अनेक ग्राहकांना अडीअडचणींचा सामना करावा लागणार आहे.

यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो तुमचा देखील बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. RBI च्या सुट्टीच्या यादीनुसार, सर्व खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका एप्रिल 2023 मध्ये 15 दिवस बंद राहतील. या 15 दिवसांत काही स्थानिक सुट्ट्या आहेत, तर काही दिवस संपूर्ण भारतात बँका बंद राहतील. पुढील महिन्यात बँका कधी बंद राहणार आहेत ते जाणून घ्या.

एप्रिल 2023 मध्ये बँक सुट्ट्या

1 एप्रिल 2023: वार्षिक खाते बंद झाल्यामुळे काही राज्ये वगळता बँका बंद राहतील.

4 एप्रिल 2023, महावीर जयंती

5 एप्रिल 2023, बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन

7 एप्रिल 2023, गुड फ्रायडे

14 एप्रिल 2023, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती / बोहाग बिहू / चिरावबा / वैसाखी / बैसाखी / तामिळ नववर्ष दिन / महा बिसुभा संक्रांती / बिजू उत्सव / बिसू उत्सव

15 एप्रिल 2023, विशू / बोहाग बिहू / हिमाचल दिवस / बंगाली नववर्ष दिन (नब्बर्ष)

18 एप्रिल 2023, शब-ए-कद्र

21 एप्रिल 2023, गरिया पूजा / जुमात-उल-विदा

22 एप्रिल 2023, रमजान ईद (ईद-उल-फित्र), दुसरा शनिवार

दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार आणि रविवारी बँका बंद राहतात

2 एप्रिल : रविवार

8 एप्रिल : दुसरा शनिवार

9 एप्रिल: रविवार

16 एप्रिल : रविवार

23 एप्रिल : रविवार

30 एप्रिल: रविवार

मार्चच्या उरलेल्या दिवसांत चार दिवस बँका बंद  राहणार

22 मार्च 2023 : गुढी पाडवा / उगादी / बिहार दिवस / साजिबू नोंगमापनबा / पहिली नवरात्री / तेलुगु नववर्ष

25 मार्च 2023: चौथा शनिवार

26 मार्च 2023: रविवार

30 मार्च 2023: राम नवमी

बँक बंद असूनही ग्राहक अनेक प्रकारची कामे डिजिटल पद्धतीने हाताळू शकतात. UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवांवर बँकांच्या सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होणार नाही. अशा स्थितीत तुमचे कोणतेही काम जे डिजिटल पद्धतीने केले जाऊ शकते, त्यावर सुट्टीचा कोणताही परिणाम होणार नाही. तुम्ही तुमचे काम आरामात पूर्ण करू शकतात.

हे पण वाचा :- Benefits Of Clove: काय सांगता ! फक्त 3 लवंगा पुरुषांसाठी करू शकतात चमत्कार ; जाणून घ्या सेवनाचे फायदे

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts