भारत

Iris Scanning : डोळे दाखवताच मिळणार बँकेतील पैसे, येणार नवा नियम; जाणून घ्या काय असेल नियम?

Iris Scanning : तुम्ही अनेकदा वेगवगेळ्या बँकेत पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी गेला असाल. तिथे पैसे काढण्यासाठी पहिल्यांदा स्लिप भरावी लागते आणि बँकेचे पुस्तक द्यावे लागते. तेव्हाच बँकेतील अधिकारी तुम्हाला पैसे देतात. मात्र आता याची गरज नाही?

तुम्हाला प्रश्न अडला असेल की याची का गरज नाही? तुम्हाला सांगतो लवकरच अबनकेकडून वेगळा नियम आणला जाऊ शकतो. डोळ्यांची ओळख पटवून बँकेतील पैसे मिळू शकतात. डोळे दाखवताच तुम्हाला त्वरित पैसे मिळू शकतात.

बबल स्कॅन बँकेकडून लवकरच नियम आणला जाऊ शकतो. त्यामुळे ग्राहकांना आता बँकेत पासबुकची गरज पडणार नाही. बँकेतील शिल्लक तपासणे आणि पैसे काढण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

येऊ शकतो नवीन नियम

नवीन नियमामुळे, बँक फसवणूक आणि करचोरी रोखण्यासाठी आणि कमी करण्यासाठी, भारत सरकारने देशातील बँकांना चेहरा ओळख आणि बुबुळ स्कॅन वापरण्यास सांगितले आहे.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, वैयक्तिक व्यवहारांची वार्षिक मर्यादा संपल्यानंतर फेस रेकग्निशन आणि आयरीस स्कॅनचा वापर व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो. रॉयटर्सच्या वृत्तात, सूत्राच्या हवाल्याने असे म्हटले आहे की काही खाजगी आणि सरकारी बँकांनी देखील हा पर्याय वापरण्यास सुरुवात केली आहे.

मात्र बँकांचे नाव समोर आलेले नाही. अहवालानुसार, फेस रेकग्निशन आयरीस स्कॅनचा वापर पडताळणीसाठी अनिवार्य नाही, परंतु ते निश्चितपणे अशा प्रकरणांमध्ये वापरले जात आहे, ज्यामध्ये कर उद्देशांसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड क्रमांक यांसारखी सरकारी ओळखपत्रे बँकांशी सामायिक केलेली नाहीत.

अर्थ मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना UIDAI च्या मुद्द्यावर आवश्यक कारवाई करण्यास सांगितले होते. व्यवहार करण्यापूर्वी त्या व्यक्तीची फेस रेकग्निशन फेस आणि आयरीस स्कॅनद्वारे व्हेरिफिकेशन करावे, असे या पत्रात सुचवण्यात आले होते.

एखाद्या व्यक्तीचे फिंगरप्रिंट प्रमाणपत्र अयशस्वी झाल्यास हे अधिक महत्त्वाचे बनते. याप्रकरणी UIDAI आणि अर्थ मंत्रालयाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts