भारत

Assembly Election 2023 Results : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालाचे लाईव्ह अपडेट्स

Assembly Election 2023 Results : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल मानल्या गेलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगण या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होईल.

मतदानोत्तर कलचाचण्यांमध्ये भाजप मध्य प्रदेशातील सत्ता राखत राजस्थानात कमळ फुलवणार, तर काँग्रेस छत्तीसगडची सत्ता राखत तेलंगणात मुसंडी मारणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आता प्रत्यक्षात मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. चारही राज्यांमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. स्थानिकांच्या मागणीनुसार, मिझोरम विधानसभा निवडणुकीची रविवारची मतमोजणी सोमवारी करण्यात येईल.

Live Updates साठी पेज रिफ्रेश करा या Post मध्ये आपण  विधानसभा निवडणूक निकालाचे LIVE अपडेट्स पाहणार आहोत.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. सध्या मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर आहे. तर छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts