भारत

HDFC Account Holders : HDFC खातेधारकांनो सावधान! तुमच्याही मोबाईलवर आला आहे हा मेसेज तर त्वरित हटवा, अन्यथा खाते होईल रिकामे

HDFC Account Holders : आजकाल संपूर्ण जगात डिजिटल युगामध्ये अनेकजण डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहार करत आहेत. पण डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहार करत असताना अनेकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे डिजिटल पेमेंट करताना सावधानता बाळगली पाहिजे.

दररोज लाखो लोकांची बँकिंग आणि डिजिटल पेमेंट फसवणुकीची हजारो प्रकरणे समोर येत आहेत. आजकाल अनेकांना स्मार्टफोनवर बँकेसंबंधित अनेक मेसेज येत आहेत. ते मेसेज इतरांसोबत शेअर केल्याने बँक खात्यातून पैसे काढून घेतले जातात.

जर तुमचीही HDFC बँकेचे ग्राहक असाल तर सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण आजकाल अनेकजण तुमची फसवणूक करण्यास टपले आहेत. तुमच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला जातो आणि आलेल्या मेसेजवर क्लिक करण्यास सांगितले जाते.

जर तुम्ही अशा मेसेजवर विश्वास ठेवला आणि तुम्ही आलेल्या मेसेज लिंकवर क्लिक केले तर तुमचा फोन हॅक केला जातो आणि तुमच्या खात्यातून पैसे काढले जातात. त्यामुळे बँक खात्याशी संबंधित माहिती कोणालाही शेअर करू नये.

ट्विटरवर एक स्क्रीन शॉट शेअर करण्यात आला आहे त्यामध्ये असे लिहले आहे की, ‘एचडीएफसी ग्राहक तुमचे एचडीएफसी नेट बँकिंग आज निलंबित केले जाईल, कृपया खाली दिलेल्या लिंकवर जा आता तुमचे पॅन कार्ड अपडेट करा.’

मेसेजमध्ये एक लिंकही आहे. दुसर्‍या वापरकर्त्याने या ट्विटला उत्तर दिले आणि एक एसएमएस शेअर केला जिथे त्याला त्याचे केवायसी अपडेट करण्यास सांगितले गेले.

त्यांना फिशिंग घोटाळ्याबद्दल इशारा देताना, HDFC बँक केअरने ट्विटला उत्तर दिले आणि लिहिले, ‘आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही पॅन कार्ड/केवायसी अपडेट किंवा इतर कोणत्याही बँकिंग माहितीसाठी विचारणाऱ्या अज्ञात क्रमांकांना प्रतिसाद देऊ नका.’

एचडीएफसी बँकेने ट्विटरमध्ये पुढे लिहिले, ‘लक्षात ठेवा, बँक कधीही पॅन तपशील, OTP, UPI, VPA/MPIN, ग्राहक आयडी आणि पासवर्ड, कार्ड क्रमांक, ATM पिन आणि CVV मागणार नाही. कृपया वैयक्तिक तपशील शेअर करू नका.

फिशिंग स्कॅम म्हणजे काय?

आजकाल अनेक स्कॅमर तुम्हाला बँकेसंबंधित बनावट मेसेज पाठवत असतात. तसेच बँकेसंबंधित आणि वैयक्तिक माहिती विचारत असतात. जर तुम्ही अशा मेसेज लिंकवर क्लिक केले तर तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात.

फसवणूक कशी टाळावी?

वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका.
नेहमी सुरक्षित पासवर्ड ठेवा.
तुम्हाला संदेश मिळाल्यास, बँक व्यवस्थापकाशी संपर्क साधा.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम करा.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts