भारत

Wifi Speed Inhancing : मस्तच! आता चारपट वेगाने धावेल वायफाय, इंटरनेट स्पीड पाहून तुम्हीही व्हाल चकित; फक्त करा हे काम

Wifi Speed Inhancing : आजच्या काळात अनेकांकडे वायफाय आहे. वायफाय वापरणे महाग आहे मात्र त्याचे स्पीड देखील भन्नाट आहे. वायफाय वापरण्यासाठी तुम्हाला रिचार्ज करावा लागतो. यासाठी तुम्हाला महिन्याला 2000 ते 4000 रुपये खर्च येत असतो.

मात्र काही वेळा वायफायचे स्पीड देखील कमी होते. त्यामुळे इंटरनेट चालवत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही वेळा यूट्यूब देखील चालत नाही. त्यामुळे अनेकजण वायफायचे स्पीड वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात.

आज तुम्हाला वायफायचे स्पीड कसे वाढवता येईल याबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही हे काम केले तर चारपट वेगाने तुमचे वायफाय काम करेल. त्यामुळे काही टिप्स तुमचे वायफाय स्पीड वाढवू शकते.

कोरोना काळापासून अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम दिले आहे. त्यामुळे अनेकांनी वायफाय कनेक्शन घेतले आहे. मात्र ऑफिसचे काम करत असताना स्लो इंटरनेटमुळे कामात देखील अडथळा येत असतो.

घरातील वायफायची जागा बदला

तुम्ही अनेकदा वायफाय कनेक्शन घेतल्यानंतर ते योग्य ठिकाणी ठेवत नाही तुटीमुळे देखील तुम्हाला स्लो इंटरनेट स्पीडला सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हाला वायफायचे चांगले स्पीड हवे असेल तर तुम्हाला वायफाय योग्य ठिकाणी ठेवावे लागेल.

जर तुम्ही घरून ऑफिस वर्क करत असाल तर घराच्या मध्यभागी वायफाय ठेवू शकता. जेणेकरून घरच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही आरामात काम करू शकता. तसेच हे वायफाय थोडे उंचीवर ठेवा म्हणजे इंटरनेट वेगाने चालेन.

ऑप्टिमायझेशन देखील महत्वाचे आहे

अनेक वायफाय सेवा पुरवणाऱ्या कंपन्या त्यांच्या वायफाय कनेक्शनसह अॅप्स देखील देतात. वास्तविक, जर वायफाय कनेक्शन स्लो चालत असेल, तर तुम्ही हे अॅप वापरून इंटरनेटचा वेग वाढवू शकता.

एअरटेल आपल्या फायबर सेवेमध्ये जे अॅप ऑफर करते त्यात एक ऑप्टिमायझेशन पर्याय आहे आणि हा पर्याय वापरून तुम्ही तुमच्या वायफाय राउटरचा इंटरनेट स्पीड मोठ्या प्रमाणात वाढवू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts