भारत

Free OTT Platform : मस्तच! आता मोफत पाहता येणार OTT प्लॅटफॉर्म Netflix, हा आहे सोपा मार्ग

Free OTT Platform : आजकाल तरुणांमध्ये OTT प्लॅटफॉर्मची क्रेझ वाढत चालली आहे. OTT प्लॅटफॉर्म पाहण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. मात्र आता तुम्हाला OTT प्लॅटफॉर्म पाहण्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करण्याची गरज नाही. कारण आता तुम्ही मोफत OTT प्लॅटफॉर्म पाहू शकता.

आता अनेकजण स्मार्टफोनवर OTT प्लॅटफॉर्म विकत घेत आहेत. तसेच नवीन आलेले चित्रपट OTT प्लॅटफॉर्म वर घरबसल्या लगेच पाहता येत असल्याने अनेकजण OTT प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. जर तुम्हाला Netflix चे सबस्क्रिप्शन हवे असेल तर तुम्हाला ते फ्रीमध्येच मिळून जाईल.

पैसे न भरता Netflix कसे वापरावे

जर तुम्हाला पैसे न भारत Netflix वापरायचे असेल तर त्यासाठी तुम्ही जिओ टेलिकॉम कंपनीचे ग्राहक असणे अनिवार्य आहे. कारण जिओ कंपनी रिचार्ज प्लॅनमध्ये Netflix मोफत देत आहे.

399 रुपयांचा Jio पोस्टपेड रिचार्ज प्लॅन

जर तुम्ही जिओ सिमकार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी कंपनीने एक भन्नाट प्लॅन आणला आहे. 399 रुपयांचा रिचार्ज करून तुम्ही मोफत Netflix सबस्क्रिप्शन मिळवू शकता. तसेच 75 GB आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचा लाभ देखील दिला जाईल.

799 रुपयांचा Jio पोस्टपेड रिचार्ज प्लॅन

जर तुम्ही जिओ सिमकार्डला 799 रुपयांचा रिचार्ज केला तर 150 GB डेटा आणि अमर्यादित व्हॉईस कॉलसह मोफत नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम दिले जाईल. त्यामुळे तुमचा या प्लॅनमध्ये दुहेरी फायदा होत आहे.

599 रुपयांचा Jio पोस्टपेड रिचार्ज प्लॅन

जर तुम्ही ५९९ रुपयांचा जिओ रिचार्ज केला तर तुम्हाला 100 GB डेटा आणि अमर्यादित व्हॉईस कॉल सुविधा मिळेल. यासोबतच तुम्हाला Amazon Prime आणि Netflix मोफत मिळेल.

999 रुपयांचा Jio पोस्टपेड रिचार्ज प्लॅन

या प्लॅन अंतर्गत रिचार्ज केल्यावर, तुम्हाला 200 GB डेटा दिला जाईल आणि यासोबतच 3 Jio सिम पूर्णपणे मोफत आणि अमर्यादित व्हॉईस कॉल आणि 100 SMS प्रतिदिन दिले जातील. तुम्ही मोकळे व्हाल मला नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम वापरण्याचा आनंदही घेता येईल

1499 रुपयांचा जिओ पोस्टपेड रिचार्ज प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला 300 जीबी डेटा दिला जाईल, यासोबतच अमर्यादित कॉलिंग देखील दिले जाईल आणि दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील दिली जाईल, यासोबत तुम्ही नेटफ्लिक्स पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts