LIC Policy : देशातील नागरिकांसाठी एलआयसीकडून दिवसेंदिवस अनेक योजना आणल्या जात आहेत. त्याचा अनेक नागरिकांना फायदा होत आहे. जे लोक गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत अशासाठी एलआयसीच्या सहा अनेक योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून लाखो रुपयांचा परतावा मिळवू शकता.
जर तुम्हीही पुढील भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसीमध्ये गुंतवणूक करू शकता. यामधील गुंतवणूक नेहमी सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.
मात्र आज ज्या एलआयसी पॉलिसीबद्दल सांगणार आहोत ती सर्वसामान्यांसाठी नसून ती श्रीमंतांसाठी आहे. ज्यांच्याकडे अधिक पैसा आहे असे लोक एलआयसीच्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकतात.
जीवन शांती योजनेत जर तुम्ही सध्या गुंतवणूक केली तर तुम्हाला निवृत्तीपूर्वीच १ लाख पेन्शन दरमहा मिळेल. त्यासाठी तुम्हाला अगोदर गुंतवणूक करावी लागेल.
एलआयसी जीवन शांती त्यांच्यासाठी आहे जे मासिक, सहामाही, वार्षिक किंवा त्रैमासिक आधारावर सातत्यपूर्ण उत्पन्न शोधतात. लवकर निवृत्ती घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनाही या व्यवस्थेचा फायदा होऊ शकतो.
पॉलिसीधारक त्यांची उद्दिष्टे एकाच प्रीमियमसह साध्य करू शकतात. गुंतवणूकीची कमाल रक्कम नाही. तुमच्या मासिक उत्पन्नाच्या आधारावर तुम्हाला हवी ती रक्कम तुम्ही देऊ शकता.
लाखो रुपये कसे मिळवायचे
जर तुम्हाला निवृत्तीनंतर मासिक पेन्शन हवी असेल तर एलआयसीच्या योजनेत गुंतवणूक करावी लागेल. तुम्हाला 1 लाख रुपये मासिक पेन्शन हवे असेल तर तुम्हाला 12 वर्षांच्या कालावधीत 1 कोटी रुपये गुंतवावे लागतील.
12 वर्षांनंतर तुमची मासिक भरपाई 1.06 लाख रुपये असेल. तुम्ही फक्त दहा वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर मासिक 94,840 रुपये पेन्शन मिळेल.
जीवन शांती योजना काय आहे?
एलआयसीने श्रीमंतांसाठी जीवन शांती योजना आणली आहे. या योजनेत गुंतवणूक करून ते मासिक पेन्शन मिळवण्यासाठी पात्र ठरू शकतात. LIC जीवन शांती विमा नॉन-लिंक्ड आणि नॉन-पार्टिसिपिंग आहे. तात्काळ अॅन्युइटी पर्यायांतर्गत, पॉलिसीधारकाला खरेदी किंमत भरल्याबरोबर पेन्शन मिळते.