भारत

Bank Employees News: ‘या’ कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसात मिळणार मोठी बातमी! सरकार घेणार मोठा निर्णय?

Bank Employees News:- केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेत असते. कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून अशा निर्णयांचे देखील खूप महत्व असते. विकास केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सरकारकडून वाढ करण्यात आलेली असून तो 42 टक्क्यांवरून आता 46 टक्के करण्यात आलेला आहे.

जर आपण केंद्र सरकारच्या इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांचा विचार केला तर  त्यांचे जेवढी संख्या आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील संख्या आहे. याच बँकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक महत्त्वाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र सरकार लवकरात लवकर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेमका केंद्र सरकारकडून काय निर्णय घेण्यात येणार आहे याबद्दलची माहिती या लेखात घेणार आहोत.

 बँकांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सर्व बँकांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्याविषयी केंद्र सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत असून देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची व्यवस्थापन संस्था असलेल्या इंडियन बँक असोसिएशनने देशातील सर्व बँकांना शनिवारी सुट्टी घोषित करण्याचा प्रस्ताव सरकारला याआधीच दिलेला आहे.

राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये सरकारच्या माध्यमातून सदर माहिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार आता बँकांचे कामकाज आठवड्यातून पाच दिवस चालू राहील अशी शक्यता आहे.

यासोबतच कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये देखील वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यसभेचे खासदार सुमित्रा बाल्मीक यांनी याबाबत अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारलेला होता. याबाबत अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सभागृहाला दिलेल्या लेखी उत्तर सांगितले की इंडियन बँक असोसिएशनने सर्व शनिवारी बँकांना सुट्टी जाहीर करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे.

परंतु यावर सरकारने काय निर्णय घेतला याबद्दल मात्र राज्य मंत्र्यांनी काही सांगितलेले नाही. 28 ऑगस्ट 2015 रोजी आयबीए आणि बँक युनियन यांच्यामध्ये जो काही करार झाला होता त्यानुसार दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांमध्ये सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता असे अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितले.

 बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात होईल 15 ते 20 टक्के वाढ

तसेच मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर 2023 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सरकारी बँकांमध्ये पाच दिवस काम करण्याच्या निर्णयासह या कर्मचाऱ्यांच्या पगारात पंधरा ते वीस टक्के वाढ करण्याच्या निर्णयाला देखील मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

त्यानंतर महिन्यातील सर्व शनिवारी बँकांना सुट्टी असेल. तसेच वेतनवाढीबाबत 12 व्या द्विपक्षीय समझोताबाबत बँक संघटना आणि आयबीए यांच्या सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पगारवाढीसोबतच बँकांमध्ये पाच दिवस काम करण्याची आणि शनिवारी सुट्टीची घोषणा एकाच वेळी होण्याची शक्यता आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts