BBC News : आज सोशल मीडियासह संपूर्ण देशात BBC खूप चर्चेत होता. त्याचा मुख्य कारण म्हणजे आज आयकर विभागाने ‘सर्वेक्षण’साठी दिल्ली आणि मुंबईतील ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या कार्यालयात पोहोचले आहे. यातच आम्ही तुम्हाला सांगतो सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT ) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की “सर्वेक्षण दिल्ली आणि मुंबईतील बीबीसी कार्यालयात केले जात आहे आणि ही रेट नाही.”
अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, कर अधिकारी आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनियमितता तपासण्यासाठी कागदपत्रे तपासत आहेत. विशेष म्हणजे, बीबीसीने ‘India: The Modi Question’ नावाचा माहितीपट प्रसारित केल्यानंतर काही आठवड्यांनंतर आयटीची ही कारवाई झाली आहे. भारत सरकारने डॉक्युमेंटरी प्रोपगंडा म्हटले आणि बीबीसीवर वसाहतवादी मानसिकता असल्याचा आरोप केला.
BBC ची स्थापना 18 ऑक्टोबर 1922 रोजी खाजगी कॉर्पोरेशन म्हणून झाली. तेव्हा ती ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणून ओळखली जात होती. सुरुवातीला बीबीसीला या व्यवसायात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागला. 1926 च्या सामान्य संपादरम्यान, बीबीसी आपल्या कव्हरेजद्वारे ब्रिटीश लोकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी झाला.
त्याच वर्षी, संसदीय समितीच्या शिफारशीनुसार बीबीसीचे खासगी कंपनीतून सार्वजनिक महामंडळात रूपांतर करण्यात आले. यासह कंपनीची संसदेला जबाबदारी निश्चित करण्यात आली होती परंतु ती तिच्या कामाच्या बाबतीत स्वतंत्र राहिली. जॉन रीथ (1889-1971) हे बीबीसीचे संस्थापक होते. 1922 मध्ये ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणून त्याची स्थापना झाली तेव्हा ते त्याचे पहिले महाव्यवस्थापक होते आणि 1927 मध्ये सार्वजनिक निगम बनले तेव्हा त्याचे पहिले महासंचालक होते.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान, ब्रिटिश सरकारने नाझी प्रचार यंत्रणेला तोंड देण्यासाठी पुन्हा एकदा माहिती मंत्रालयाची निर्मिती केली. सरकारने जॉन रीथ यांना माहिती मंत्री केले. युरोपमध्ये हिटलरच्या विरोधात प्रचार करणे आणि ब्रिटीश जनतेला युद्धासाठी मानसिकरित्या तयार करणे हे त्याचे कार्य होते. बीबीसीचा बहुतांश निधी ब्रिटिश सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या वार्षिक टेलिव्हिजन शुल्कातून येतो.
हे पण वाचा :- iQOO Phone Offers : अरे वाह.. होणार हजारोंची बचत ! 18 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करा ‘हा’ भन्नाट 5G फोन; असा घ्या लाभ