भारत

Beleshwar Mahadev Temple : रामनवमीला मोठी दुर्घटना ! बेलेश्वर महादेव मंदिरातील विहिरीचे छत कोसळले ; 25 भाविक आत पडले

Beleshwar Mahadev Temple : समोर आलेल्या माहितीनुसार रामनवमीच्या दिवशी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार इंदूरमधील बेलेश्वर महादेव मंदिरात विहिरीवरील छत कोसळली त्यामुळे अनेक जण विहिरीत पडले.

सध्या विहिरीत पडलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु असून आतापर्यंत 7-8 जणांना बाहेर काढण्यात आले आहे आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार स्नेह नगरजवळील पटेल नगरमध्ये हा अपघात झाला. येथे बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरातील विहिरीवरील छत कोसळले त्यामुळे त्यावर उपस्थित लोक विहिरीत पडले.

रामनवमीला मंदिरात हवन होत असल्याचे सांगण्यात येत आहे. यात सहभागी होण्यासाठी लोक मोठ्या संख्येने पोहोचले होते. लोक पूजा आणि आरती करत होते. मंदिरात एक पायरी विहीर होती, त्यावर 10 वर्षांपूर्वी छत टाकण्यात आले होते.

पूजेच्या वेळी 20-25 लोक पायरीच्या छतावर उभे होते, तेव्हा छत कोसळल्याने सुमारे 20-25 जण विहिरीत पडले. ही पायरी विहीर 50 फूट खोल असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. मात्र, विहिरीत पाणी असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. लोकांना मंदिराजवळ जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या

बेलेश्वर महादेव मंदिरातील घटनेची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दखल घेतली आहे. शिवराज सिंह यांनी इंदूरचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना फोन करून बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असते.

इंदूरचे खासदार शंकर लालवानी यांनी सांगितले की, संख्या सांगणे कठीण आहे. 7 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. विहिरीत पडलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याला आमचे प्राधान्य आहे. बचाव पथक, पोलीस आणि स्थानिक लोक लोकांना बाहेर काढण्यात व्यस्त आहेत.

ज्यांना बाहेर काढण्यात आले आहे त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, लोकांना दोरी लावून बाहेर काढले जात आहे. रेस्क्यू टीमचे लोक विहिरीतून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन तेथे पोहोचले आहे.

हे पण वाचा :-   Best Family Cars : बिनधास्त खरेदी करा ‘ह्या’ 5 फॅमिली कार ! जबरदस्त परफॉर्मन्ससह मिळणार भन्नाट मायलेज ; पहा लिस्ट

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts