Best Summer Destination : उन्हाळा सुरु झाला आहे. या दिवसांमध्ये अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. पण अनेकांना देशातील काही सुंदर ठिकाणे माहिती नसतात. त्यामुळे अनेकजण विदेशात फिरायला जातात. पण भारतामध्ये अशी काही ठिकाणे आहेत त्याचे सौंदर्य तुम्हाला वेड लावू शकते.
भारतात अनेक हिल स्टेशन आहेत ज्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. सध्या उष्णता वाढत चालली आहे. तुम्ही या ठिकाणी जाऊन मस्त थंडगार हवेचा आनंद घेऊ शकता. आज तुम्हाला देशातील ५ सर्वोत्तम ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.
मनाली
या ठिकाणी दरवषी लाखो पर्यटक भेट देत असतात. तसेच विदेशातूनही देखील या ठिकाणी पर्यटक येत असतात. भारतातील सवोत्तम ठिकाणांपैकी हे एक सुंदर ठिकाण आहे. पीर पंजाल आणि धौलाधर पर्वतरांगांची विहंगम दृश्ये, हिरव्यागार खोऱ्यातील नैसर्गिक वातावरण पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत असतात.
तवांग
तवांगला भारताचे स्वित्झर्लंड म्हंटले जाते. जर तुम्हाला स्वित्झर्लंडचा आनंद घेईचा असेल तर तुम्हाला तवांगला भेट द्यावी लागेल. प्राचीन मंदिरे आणि मठांची ही जागा दलाई लामा यांचे जन्मस्थान देखील आहे. नैसर्गिक सौंदर्याचा हा अध्यात्माचा संगम तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही.
गंगटोक
सुंदर आणि मनमोहक नैसर्गिक दृश्य पाहायची असतील तर तुम्हाला गंगटोकला एकदा तरी भेट द्यायला लागेल. हिमालयाच्या शिवालिक टेकड्यांवर वसलेले हे सुंदर शहर पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात.
ऊटी
उटी हे नाव तुम्ही अनेकदा ऐकले असेल. या ठिकाणी उंचच्या उंच डोंगर आणि हिरवेगार नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. येथील थंड हवा पर्यटकांना चांगलीच आकर्षित करते.
राणीखेतला
उत्तराखंडच्या प्रमुख हिल स्टेशनपैकी एक, राणीखेत निश्चितपणे ब्रिटिशांनी विकसित केले होते, परंतु येथील सौंदर्य नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. हिमालयाच्या टेकड्या आणि पाइन जंगलांचे चित्तथरारक दृश्य हे ठिकाण खास बनवते, उन्हाळ्यातही राणीखेतचे तापमान 8 ते 22 अंशांच्या दरम्यान राहते.