Best Summer Destination : तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करताय आणि तुम्हाला सुंदर पर्यटन स्थळे माहिती नाहीत तर काळजी करू नका. कारण आज तुम्हाला भारतातील काही सुंदर पर्यटन स्थळांबाबत माहिती देणार आहोत.
देशभरात फिरण्यासाठी अनेक जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. यापैकी मनाली हे एक पर्यटकांना आकर्षित करणारे पर्यटन स्थळ आहे. मनाली या पर्यटन स्थळाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात.
मनालीच नाही तर मनालीच्या आसपास देखील अनेक पर्यटन स्थळे आहेत. मनालीला फिरायला गेल्यानंतर तुम्ही आसपासच्या पर्यटन स्थळांना देखील भेट देऊ शकता आणि तुमची सहल आनंददायी बनवू शकता.
जर तुम्हाला या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शिमला सारख्या हिल स्टेशनला भेट देईची असेल तर तुम्ही अवश्य आसपासच्या ठिकाणांना भेट देऊन आनंद घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता.
मनालीतील सुंदर ठिकाणे
पतलीकुहुल
मनालीच्या अवघ्या काही अंतरावर पतलीकुहुल हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. २७ मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण आहे. हिमाचलच्या पर्वतरांगामधील हे एक सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही भेट देऊन सहलीचा आनंद वाढवू शकता.
मलाना
जर तुम्ही मनालीला फिरायला गेला तर मलाना या सुंदर ठिकाणाला देखील भेट देऊ शकता. मनालीहून या ठिकाणी जायला फक्त २ ते २.३० तास लागतील. येथे तुम्हाला अनेक पर्वत आणि अनेक लाकडी मंदिरे देखील पाहायला मिळतील.
थानेदार
मनालीहून अवघ्या ३ तासांवर असलेले थानेदार हे ठिकाण सफरचंद आणि चेरीच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात सफरचंदाची निर्यात केली जाते.
सॉईल गाव
मनाली या सुंदर पर्यटन ठिकाणी तुम्हीही जाणार असाल तर सॉईल या सुंदर ठिकाणी देखील तुम्ही भेट देऊ शकता. या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. इथली उंच झाडं आणि स्वच्छ वातावरण पाहून तुम्हाला आनंददायी वाटेल.