Vastu Tips : आजही देशात अनेकजण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत असतात. त्यामुळे घरत आणि घाबाहेर अनेक वस्तू लावत असतात. मात्र अशा वासू लावल्याने घरात मोठे नुकसान होईल असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे जर तुम्हीही असे काही लावले असेल तर त्वरित काढून टाका.
अनेक लोक घराबाहेर भूताचा मुखवटा लावत असतात. जेणेकरून बाहेरून येणारी लोकांच्या नजरेत हा मुखवटा यावा. तसेच अनेक लोक घराबाहेर फाटलेले बूट, जुना टायर किंवा इतर काही कुरूप वस्तू देखील ठेवत असतात.
जर तुम्हीही असे करत असाल तर तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. घरामध्ये कोणत्या वस्तू कुठे लावाव्या हे वास्तुशास्त्रात अगोदर पहिले पाहिजे. त्यानंतरच तुम्ही घरत अशा काही वस्तू लावा जेणेकरून भाग्य उजळेल.
मुख्य दरवाजा आणि घराच्या बाहेर या गोष्टी लक्षात ठेवा
खालील वस्तू कधीही घरात आणू नका
घरामध्ये कधीच अशुभ, अशुभ किंवा कुरूप दिसणारी आणू नये. अशा वस्तू नेहमी घराबाहेर ठेवाव्या. वास्तुशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की अशा वस्तू नेहमी घराबाहेर ठेवाव्यात. जर अशा वस्तू घरात आणल्या तर दारिद्र्य येऊ शकते.
घोड्याचा नाल वापरू नये
काही लोक काळ्या घोड्याचा जोडा इतरांनी पाहण्यासाठी त्यांच्या घराबाहेर टांगतात. त्यांचा असा विश्वास आहे की ते दुर्दैव टाळतात. वास्तू किंवा ज्योतिषात असा कोणताही नियम नाही. शनीच्या ग्रहामुळे कोणाला समस्या येत असतील तर त्याच्यासाठी काही उपाय सांगितले जातात. पण घराबाहेर घोड्याचा नाल लावणे अशुभ आहे.
घराबाहेर गणपतीची मूर्ती ठेवा
घराच्या अबेहरील बाजूस मुख्य दरवाजाच्यावर गणपतीची मूर्ती बसावा. जेणेकरून तुम्हाला अडथळ्यांपासून मुक्ती मिळेल. घराबाहेर गणपतीची मूर्ती बसवणे शुभ मानले जाते. तसेच या मूर्तीची दररोज पूजा करा आणि जर रोज जमत नसेल तर चतुर्थीला पूजा करा.
गणेश मूर्ती घराबाहेर लावायची नसेल तर हे लावा
जर तुम्हाला गणेशाची मूर्ती घराबाहेर ठेवायची नसेल तर तेही ठीक आहे. तुम्ही तुमच्या घराबाहेर सुंदर फुलांची रोपे लावू शकता. वास्तूनुसार घराबाहेर सुंदर फुलांची झाडे किंवा हिरवळ असेल तर ते देखील शुभ असते. अशा घरात लक्ष्मीची कधीच कमतरता नसते आणि त्या घराची नेहमी प्रगती होते.