भारत

Egg Side Effects : सावधान! चुकूनही या ५ आजारांमध्ये खाऊ नका अंडी, अन्यथा वाढतील समस्या…

Egg Side Effects : थंडीमध्ये अंडी खाणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. डॉक्टरही अनेकवेळा अंडी खाण्याचा सल्ला देत असतात. मात्र काही वेळा आजारी असताना अंडी खाणे धोकादायक ठरू शकते. अंडी खाण्याचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात.

अंड्यांमध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. अंड्यामधून शरीराला खूप ऊर्जा मिळते. तसेच काही आजारामध्ये अंडी रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. मात्र काहीवेळा अंडी शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात.

1. त्वचेची समस्या

थंडीच्या दिवसांत अनेकदा जास्त प्रमाणात अंडी खाल्ली जातात. कारण अंड्यामध्ये उष्णता जास्त असते. मात्र त्वचेचा आजार असेल तर अंडी खाल्ल्याने तो आणखी वाढू शकतो. तसेच चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. त्यामुळे अशा स्थितीत अंडी खाणे धोकादायक ठरू शकते.

2. हृदयरोग

हृदयरोग असलेल्या रुग्णांना आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. अशा लोकांना कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत गरजेचे असते. मात्र अंडी खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.

3. इन्सुलिन प्रतिकार

जर एखादी व्यक्ती दररोज एका मर्यादेपेक्षा जास्त अंडी खात असेल तर त्याचे शरीर इन्सुलिन प्रतिरोधक बनू शकते. साधारणपणे दिवसातून २ ते ३ अंडी खाण्याचाही सल्ला दिला जातो. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

4. कर्करोगाचा धोका

ज्या लोकांना कर्करोग आहे किंवा त्याचा धोका आहे तर अशा लोकांनी अंडी खाणे टाळावे. कारण संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की जे लोक जास्त अंडी खातात त्यांना कोलोरेक्टलसह इतर प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

5. इनडाइजेशन

जर तुमची पचनक्रिया बरोबर नसेल किंवा तुम्हाला बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटी, अपचन किंवा मळमळ यासारख्या तक्रारी असतील तर अशा परिस्थितीत तुम्ही अंडे खाणे टाळावे कारण त्यामुळे पोटाच्या समस्या वाढतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts