High Blood Pressure : चुकीचा आहार आणि चुकीची जीवनशैली आजकालच्या तरुणांना आजाराच्या विळख्यात ओढत आहे. कॅन्सर, ब्लड प्रेशर यासारखे गंभीर आजार लहान वयात होऊ लागल्याने अनेकजण त्रस्त झाले आहेत.
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुगणांनी व्यायाम करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. कारण काही व्यायाम त्यांच्या जीवावरही बेतू शकतात. योगासन हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
सकाळ सकाळी अनेकज तुम्हाला धावताना दिसतील किंवा चालताना. धावल्याने आरोग्य उत्तम राहते. मात्र उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी धावणे टाळावे. कारण धावल्याने जास्त धाप लागते. त्यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्यांना हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी जिममध्ये व्यायाम करताना अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे. कारण काही वेळा जड वस्तू उचलणे देखील हानिकारक ठरू शकते. अशा रुग्णांनी जिममध्ये वेट लिफ्टिंग करू नये. जर असे केल्यास रुग्णाचा रक्तदाब वाढू शकतो.
जिममध्ये व्यायाम करताना डेडलिफ्ट करता साल तर सावधान, कारण यामध्ये तुम्ही जमिनीवरून जास्त वजन उचलून खांद्याच्या वर नेता. कधी कधी हे देखील तुमच्या आरोग्याला हानिकारक ठरू शकते.
बेंच प्रेसचा व्यायाम छातीच्या वरच्या स्नायूंसाठी केला जातो. मात्र उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हा व्यायाम करणे टाळावे. उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी जिममध्ये नेहमी काळजीपूर्वक व्यायाम करावा.
ताकद वाढवण्यासाठी बारबेल स्क्वॅट व्यायाम खूप फायदेशीर मानला जातो. मात्र उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हा व्यायाम करणे टाळावे. अन्यथा हे त्यांच्या जीवावर बेतू शकते. यामध्ये उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांचा जीवही जाऊ शकतो.