7th Pay Commission Breaking : यंदाची होळी शेतकऱ्यांसाठी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची ठरणार आहे. शेतकऱ्यांना २ हजार रुपये देऊन केंद्र सरकारने त्यांची होळी गोड केली आहे. तर आता कर्मचाऱ्यांची होळी गोड करण्यासाठी केंद्र सरकार आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
आज केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाची होळी कर्मचाऱ्यांसाठी गोड होऊ शकते.
देशातील १ कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोदी सरकार आज मोठी भेट देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारकडून आज महागाई भत्त्यात वाढ केली जाण्याची घोषणा केली जाऊ शकते. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महागाई भत्ता वाढीच्या निर्णयास मंजुरी मिळू शकते.
मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
आज १ मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच महागाई भत्ता वाढल्यास कर्मचाऱ्यांना ३१ वाढीव पगार मिळू शकतो. तसेच पेन्शन धारकांनाही वाढीव पेन्शन मिळू शकते.
महागाई भत्त्यात ४ टक्के अपेक्षित
केंद्रीय कर्मचाऱ्यांची पाठीमागच्या वेळी केंद्र सरकारकडून ४ टक्के महागाई भत्ता वाढ केली होती. तसेच आताही कर्मचाऱ्यांना ४ टक्के DA वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे जर कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ झाली तर ४२ टक्के DA होऊ शकतो. सध्या कर्मचाऱ्यांचा DA ३८ टक्के आहे.
18,000 च्या किमान मूळ पगारावर गणना
कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन रु. 18,000
नवीन महागाई भत्ता (42%) रु.7560/महिना
आत्तापर्यंतचा महागाई भत्ता (38%) रु.6840/महिना
किती महागाई भत्ता वाढला 7560-6840 = रु 720/महिना
वार्षिक पगारात 720X12 = 8640 रुपये वाढ
कमाल मूळ पगाराची गणना रु.56900
कर्मचार्यांचे मूळ वेतन रु 56900
नवीन महागाई भत्ता (42%) रु 23898/महिना
आतापर्यंत महागाई भत्ता (38%) रुपये 21622/महिना
किती महागाई भत्ता वाढला 23898-21622 = रु 2276/महिना
वार्षिक पगारात वाढ 2276X12 = रु. 27312
महागाई भत्ता वर्षातून दोनदा सुधारित केला जातो
वाढती महागाई पाहता कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुरळीत चालावे यासाठी केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ केली जाते. वर्षातून २ वेळा कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ केली जाते. मात्र या नवीन वर्षी एकदाही DA वाढ करण्यात आलेली नाही.