Maruti Suzuki Car : मारुती सुझुकी कंपनीच्या कार ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. तसेच या कंपनीच्या कार सर्वाधिक विकल्या जात आहेत. पहिल्यापासूनच या कंपनीने ग्राहकांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे.
कंपनीकडून नवनवीन कार सादर केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी कंपनीने मध्यम आकाराची SUV Grand Vitara देशांतर्गत बाजारात लॉन्च केली आहे. मात्र कंपनीकडून या कार पुन्हा मागवणात आल्या आहेत.
या कारमध्ये काही त्रुटी असल्याने कंपनीकडून ११,१७७ कार पुन्हा मागवण्यात आल्या आहेत. मारुती सुझुकी कंपनीच्या कार पुन्हा कंपनीमध्ये मागवण्याची सत्र काही थांबताना दिसत नाही.
8 ऑगस्ट 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 दरम्यान तयार करण्यात आलेल्या मारुती ग्रँड विटाराच्या युनिट्सचा या रिकॉलमध्ये समावेश करण्यात आला आहे. मारुती सुझुकी इंडिया (MSI) ने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की मागील सीट बेल्ट माउंटिंग ब्रॅकेटमध्ये संभाव्य दोष सुधारण्यासाठी प्रभावित लॉट परत मागवण्यात आले आहेत. यापूर्वीही सीट बेल्ट आणि एअरबॅगमधील दोषांमुळे त्यांनी आपली वाहने परत मागवली होती.
कार निर्माते म्हणाले की, असा संशय आहे की मागील सीट बेल्ट माउंटिंग ब्रॅकेटमध्ये काही समस्या आहे ज्यामुळे ते सैल झाले असावे. अशा आपत्कालीन परिस्थितीत, ते योग्यरित्या कार्य करू शकत नाही.
अधिकृत मारुती सुझुकी डीलरशिपद्वारे प्रभावित ग्रँड विटाराच्या मालकांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला जाईल. जेणेकरून लवकरात लवकर वाहनांची तपासणी करून ही समस्या दूर करता येईल.
कंपनीने दुरुस्तीसाठी पुन्हा मागवलेल्या कारवर कोणताही शुल्क आकारण्यात येणार नाही. डीलरशिपद्वारे वाहन मालकांशी फोन, संदेश किंवा ईमेलद्वारे संपर्क साधला जाईल. त्यानंतर तुमची कार कंपनी पुन्हा घेऊन जाईल आणि परत करेल.
कंपनीकडून मागच्या आठवड्यातच Alto K10, Brezza, S-Presso, Eeco, Grand Vitara आणि Baleno सारख्या मॉडेलचे 17,362 युनिट्स परत मागवले होते. आता Grand Vitara कारची ११ हजार युनिट्स परत मागवण्यात आले आहेत.