भारत

LPG Cylinder Customers : LPG सिलिंडर वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता तुमचा सिलिंडर थेट मोबाईलशी जोडला जाणार…

LPG Cylinder Customers : देशात महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच गॅस सिलिंडरही महाग होत आहे. अशात आता गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. आता गॅस सिलिंडर थेट मोबाईलशी जोडला जाणार आहे.

लवकरच गॅस सिलिंडरवर QR कोड देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना गॅस सिलिंडरचे अचूक वजन समजणार आहे. अनेकदा ग्राहकांकडून गॅस कमी असल्याच्या तक्रारी करण्यात येतात.

त्यामुळे आता ग्राहकांच्या सोयीसाठी नवीन पाऊले उचलली जात आहेत. आता QR कोड प्रक्रिया आणली जाणार आहे. गॅस चोरी पकडण्यासाठी सरकारकडून कठोर नियम बनवले जात आहेत.

LPG सिलेंडरमध्ये QR कोड असा असणार

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, गॅस चोरी रोखण्यासाठी सरकार लवकरच एलपीजी सिलिंडरला QR कोडसह सुसज्ज करणार आहे.

काही मार्गांनी ते आधार कार्डसारखेच असेल. या QR कोडचा वापर करून आता गॅस सिलिंडरमधील गॅसचा मागोवा घेणे खूप सोपे होणार आहे. तसेच, गॅस सिलिंडरमधून चोरीला गेलेला गॅस शोधणे तुलनेने सोपे होईल.

हरदीप सिंग पुरी म्हणाले की, लवकरच सर्व एलपीजी सिलिंडर QR कोडने सुसज्ज होतील. सरकार आता या प्रकल्पावर काम करत आहे. येत्या काही महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा नवीन गॅस सिलेंडरमध्ये QR कोड असेल. गॅस सिलेंडरवर क्यूआर कोडसह मेटल स्टिकर देखील असेल.

तक्रारीचे निराकरण सहज होणार

गॅस सिलिंडरबाबत काही तक्रार असेल तर त्याचे निराकरण लगेच करण्यासाठी सरकारकडून क्यूआर कोड समाविष्ट केला जाणार आहे. ग्राहकांना लगेचच तक्रारीचे संधान झाले पाहिजे यासाठी सरकार नवीन नियमावली आणण्याच्या तयारीत आहे.

क्यूआर कोडमुळे सर्वकाही ट्रॅक करणे शक्य होणार आहे. गॅस चोरी होताना लगेच चोर पकडला जाईल. क्यूआर कोडमुळे गॅस चोरी होणे थांबेन असे सरकारचे म्हणणे आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts