7th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होळीपूर्वी बंपर वाढ होणार आहे. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाची १ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे.
महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर देशातील 47 लाख कर्मचाऱ्यांना आणि 68 लाख पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे. आता फक्त केंद्र सरकारकडून महागाई भात्यातील वाढीबाबत परिपत्रक जारी करणे आणि घोषणा बाकी आहे.
केंद्र सरकारकडून महागाई भत्ता वाढीस ग्रीन सिग्नल दिला आहे मात्र त्याबाबत अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. होळीपूर्वी केंद्र सरकारकडून महागाई भत्त्याच्याबाबत घोषणा केली जाऊ शकते.
यानंतर म्हणजेच होळीनंतर अर्थ मंत्रालय त्याची अधिसूचना जारी करेल. माहितीनुसार, महागाई भत्त्याच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा प्रस्ताव मंजूर केला, त्यानंतर डीए आता 38 वरून 42 टक्के होईल.
जर केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली तर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२३ पासून वाढीव महागाई भत्ता आणि कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे.
18,000 च्या किमान मूळ पगारावर गणना
कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन रु. 18,000
नवीन महागाई भत्ता (42%) रु.7560/महिना
आत्तापर्यंतचा महागाई भत्ता (38%) रु.6840/महिना
किती महागाई भत्ता वाढला 7560-6840 = रु 720/महिना
वार्षिक पगारात 720X12 = 8640 रुपये वाढ
56900 रुपये कमाल मूळ पगाराची गणना
कर्मचार्यांचे मूळ वेतन रु 56900
नवीन महागाई भत्ता (42%) रु 23898/महिना
आतापर्यंत महागाई भत्ता (38%) रुपये 21622/महिना
किती महागाई भत्ता वाढला 23898-21622 = रु 2276/महिना
वार्षिक पगारात वाढ 2276X12 = रु. 27312
वर्षातून २ वेळा DA मध्ये वाढ
केंद्र सरकारकडून वाढती महागाई पाहता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा वाढ केली जाते. मात्र नवीन वर्षात एकदाही महागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता होळीपूर्वी महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली जाऊ शकते.
गेल्या वर्षी २०२२ मध्ये कर्मचाऱ्यांचा DA ३४ टक्के होता मात्र दुसऱ्या महागाई भत्ता वाढीमध्ये केंद्र सरकारकडून ४ टक्के वाढ करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांचा DA ३८ टक्के झाला आहे. तसेच आता आणखी ४ टक्के वाढ केल्याने कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के होऊ शकतो.