EPFO Update : पीएफ खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण पीएफ खात्यातील पैशावरील व्याजबाबत मोठी EPFO कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच पीएफ खातेधारकांच्या खात्यात पीएफच्या व्याजाचे पैसे जमा होणार आहे.
पीएफ खातेधारक बऱ्याच दिवसांपासून पीएफच्या व्याजाचे पैशाची वाट पाहत आहेत. मात्र पीएफच्या व्याजाचे पैसे मिळाले नाहीत. मार्च महिना आर्थिक वर्षासाठी महत्वाचा मनाला जातो. एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होते.
तक्रारीची सुनावणी
बर्याच तक्रारींनंतर EPFO ने व्याजाच्या रकमेच्या हस्तांतरणाबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणतात की यावेळी पीएफवर 8.1% व्याजदर असेल. याशिवाय रक्कम हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यात काही कालावधी लागू शकतो. खातेदारांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. त्यांचे पैसे वेळेवर हस्तांतरित केले जातील.
पीएफ नियमांमध्ये बदल
१ फेब्रुवारी २०२३ रोजी देशाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांसाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच पीएफच्या नियमांत देखील बदल झाले आहेत.
पीएफमध्ये जमा केलेले पैसे काढण्यावरील टीडीएस 30% वरून 20% पर्यंत कमी करून कर कमी केला आहे. अशा परिस्थितीत त्याचा फायदा ग्राहकांना सातत्याने होत आहे.
कोणत्याही कर्मचाऱ्याच्या पगारावर 12% कपात EPF खात्यात केली जाते. या पैशाची माहिती गोळा करण्यासाठी सरकारकडून तुम्हाला अनेक पर्याय देण्यात आले आहेत.