Biggest Highway:- दळणवळणाच्या विकसित आणि कार्यक्षम सोयीसुविधा असणे हे कुठल्याही देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असते. यामध्ये रस्ते मार्ग तसेच रेल्वे आणि हवाई वाहतूक यांचा खूप मोलाचा सहभाग असतो. या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधा उभारण्याकडे प्रत्येक देशाच्या सरकारचे विशेषतः लक्ष असते.
या अनुषंगाने भारतामध्ये देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रकारच्या महामार्गाची कामे सुरू असून उत्तम आणि विकसित अशा रस्त्यांचे जाळे विस्तारले जात आहे. रस्त्यांची उभारणी करताना त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे उत्तम क्वालिटीचे आणि विविध सोयी सुविधा असणाऱ्या रस्त्यांची निर्मिती भारतात देखील होत आहे.
महाराष्ट्रात देखील अनेक रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत. या सगळ्या जगातील किंवा भारतातील महामार्गांची माहिती घेत असताना जगातील सर्वात मोठा महामार्ग कोणता व तो कोणत्या देशात आहे? त्याच्याबद्दल जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. याचा अनुषंगाने या लेखामध्ये आपण जगातील सर्वात मोठा महामार्ग कोणता? याबद्दल माहिती घेणार आहोत.
हे आहेत जगातील सर्वात मोठे महामार्ग
जागतिक स्तराचा विचार केला तर अनेक मोठमोठे हायवे असून यामध्ये उत्तर आणि दक्षिण अमेरिकेला जोडणारा जो काही पॅन अमेरिकन हायवे आहे तो सर्वात मोठा महामार्ग आहे. याची लांबी तब्बल 48 हजार किलोमीटर असून त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियातील महामार्ग असून तो 14500 किलोमीटर लांबीचा आहे.
तिसऱ्या क्रमांकावर ट्रान्स सायबेरियन हायवे असून त्याची लांबी 11000 किलोमीटर इतकी आहे. याच्यानंतर चौथ्या क्रमांकावर कॅनडा या देशातील ट्रान्स कॅनडा हायवे असून त्याची लांबी 7821 किलोमीटर आहे. त्यानंतर एशियान हायवेचा नंबर लागतो. याची लांबी दहा हजार 380 किलोमीटर आहे.
त्यानंतर भारतातील गोल्डन चतुर्भुज हायवे अजून त्याची लांबी दहा हजार किलोमीटर इतकी आहे.यामध्ये जर गोल्डन चतुर्भुज हायवेचा विचार केला तर तो दिल्ली,मुंबई,चेन्नई आणि कोलकत्ता या शहरांना तीन हजार सहाशे महिलांच्या लूप मध्ये जोडतो व हा 2012 मध्ये पूर्ण करण्यात आला आहे. या महामार्गाची सुरुवात देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सुरू केली होती. त्यांच्या कार्यकाळामध्ये या महामार्गाचे काम हाती घेण्यात आले होते व 2012 साली ते पूर्ण करण्यात आले.