भारत

Budget 5G Smartphones : शक्तिशाली बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा असलेले हे आहेत बजेटमधील 5 सर्वोत्तम स्मार्टफोन, किंमत 15 हजारांपेक्षा कमी

Budget 5G Smartphones : देशात सध्या आता 5G नेटवर्क चाचणी सुरु आहे. टेलिकॉम कंपन्यांकडून देशातील अनेक शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आता 4G स्मार्टफोन मागे पडू लागले आहेत. आता स्मार्टफोन्स कंपनीकडून 5G नेटवर्क प्रणाली असलेले स्मार्टफोन लॉन्च केले जात आहेत.

मात्र 5G स्मार्टफोनची किंमत जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे कंपन्यांकडून हेच लक्षात घेता आता ग्राहकांच्या बजेटमधील 5G स्मार्टफोन लॉन्च केले जात आहेत.

तुमचेही बजेट 15 हजार किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही देखील या बजेटमध्ये 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता. भारतीय बाजारात 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीतील 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

तुमच्या बजेटमधील 5 स्मार्टफोन

POCO M4 Pro 5G

तुम्हाला 5G स्मार्टफोन खरेदी करायचा आहे तर तुमच्यासाठी POCO M4 Pro स्मार्टफोन सर्वोत्तम ठरू शकतो. तुम्ही हा स्मार्टफोन Amazon वरून 14,949 रुपयांना खरेदी शकता. या स्मार्टफोनमध्ये 90Hz 6.6 इंच FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.

स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर, 5000mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 50MP प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही कमी किमतीत हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

Realme 9i 5G

तुम्हालाही Realme कंपनीचा बजेटमधील 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर Realme 9i 5G हा स्मार्टफोन सर्वोत्तम आहे. हा स्मार्टफोन तुम्ही 14,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये Dimensity 810 5G प्रोसेसर, 5000mAh बॅटरी, 50MP प्राथमिक रिअर कॅमेरा, 90Hz अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले देण्यात आला आहे.

Redmi 11 Prime 5G

Redmi 11 Prime 5G स्मार्टफोन हा एक तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. कारण हा देखील स्मार्टफोन तुमच्या बजेटमधील आहे. या स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपय आहे. या स्मार्टफोनमध्ये 90Hz FHD + डिस्प्ले, 50MP AI ड्युअल रियर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात येत आहे.

Samsung Galaxy F23 5G

14,999 रुपयांमध्ये तुम्ही देखील Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोननं खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर, 120Hz फुल-एचडी + डिस्प्ले, 50MP + 8MP + 2MP रिअर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी देण्यात येत आहे.

Vivo T2x 5G

तुम्हालाही 15 हजार रुपयांच्या आतील स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर Vivo T2x 5G स्मार्टफोन हा एक उत्तम पर्याय आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 50 MP + 2 MP रियर कॅमेरा देण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts