Steel and Cement Price : अनेकांचे स्वप्न असते की छोटे का होईना पण स्वतःचे पक्के घर असावे. मात्र घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे लागतात आणि सर्वसामान्यांचे बजेट कमी असते. त्यामुळे अनेकदा त्यांचे स्वप्न अपूर्णच राहते.
मात्र कमी बजेट असणारे देखील सध्याच्या परिस्थिती घर बांधू शकतात. कारण स्टील सिमेंटच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे घरासाठी लागणाऱ्या महत्वाच्या दोन घटकांच्या किमती घसरल्याने घर बांधणे सोपे झाले आहे.
घर बांधण्यासाठी अनेक वस्तू लागतात. मात्र किमती जास्त असल्याने अनेकजण घर बांधण्यासाठी टाळाटाळ करत असतात. मात्र स्टील आणि सिमेंटचे दर सध्या सामान्य स्थितीवर असल्याने घर बांधणे सोपे आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत बांधकाम क्षेत्रातील कामे वाढतात त्यामुळे स्टील आणि सिमेंटच्या मागणीत सर्वाधिक वाढ होत असते. मात्र सध्या बांधकाम क्षेत्रातील कामे कमी असल्याने स्टील आणि सिमेंट स्वस्त होत आहेत.
स्टील आणि सिमेंटच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत. गेल्या ६ महिन्यांत स्टीलच्या किमती ४० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे घर बांधण्याची हीच सुवर्णसंधी आहे.
स्टील आणि सिमेंटच्या किमती
सध्या स्टीलची किंमत 6500 प्रति क्विंटलच्या आसपास आहे. स्टीलच्या किमतीमध्ये जवळपास १८ टक्के जीएसटी आकाराला जातो. तर सिमेंटचे सध्याचे भाव प्रति पिशवी ३३५ ते ४०० रुपये आहे.
बांधकाम साहित्य महाग होत आहे
आजच्या काळात घर बांधणे हे खूप अवघड काम झाले आहे. स्टील,सिमेंट आणि वाळू दिवसेंदिवस महाग होत आहे. त्यांच्या किमतीत किंचित घट झाली आहे. किमतीत थोडा बदल झाला तर त्याचा परिणाम बजेटवर दिसून येतो.