Steel and Cement Rate : जर तुम्हीही घर बांधण्याचा विचार करत असाल तर सध्या तुम्ही कमी बजेटमध्ये स्वप्नातील घर साकारू शकता. स्टील आणि सिमेंटचे दर कमी झाले आहेत त्यामुळे कमी खर्चात घर पूर्ण करणे शक्य आहे. स्टील आणि सिमेंटच्या दरात चढ उतार सुरु आहे.
सर्वसामान्यांना घर बांधण्यासाठी एक एक पैसा जमा करावा लागतो. तेव्हाच ते स्वप्नातील घर पूर्ण अरु शकतात. मात्र सर्वसामान्यांना सध्या कमी बजेटमध्ये घर बांधण्याची सुवर्णसंधी आहे. बांधकाम क्षेत्रात मंदीमुळे स्टील आणि सिमेंटचे दर कमी झाले आहेत.
प्रत्येकाचे स्वतःचे छोटे का होईना घर असण्याचे स्वप्न असते. मात्र देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वच वस्तू महाग होत चालल्या आहेत. मात्र आता घर कमी खर्चात घर बांधू शकता.
सध्या बांधकाम क्षेत्रात कमी कामे चालू असल्याने स्टील आणि सिमेंटच्या मागणीत घट झाली आहे. मात्र लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. या दिवसांत स्टील आणि सिमेंटच्या मागणीत वाढ होते आणि दरही वाढतात.
स्टील आणि सिमेंटच्या किमतीत दिलासा
सध्या, जे लोक सध्या घर बांधण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे, कारण स्टील आणि सिमेंटच्या किमतींमध्ये बरीच अस्थिरता आहे. तसे, स्टील आणि सिमेंटच्या किमतीत चढ-उताराची परिस्थिती सुरूच आहे.
स्टीलची किंमत
आज सर्या स्टीलच्या दरात घट झाली आहे. स्टीलचा भाव जवळपास 70000 प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता. मात्र आता भाव कमी झाले आहेत
12 मिमी स्टील किंमत
57,545 रुपये प्रति क्विंटल
8 मिमी स्टील किंमत
60,590 रुपये प्रति क्विंटल
16 मिमी स्टील किंमत
58,545 रुपये प्रति क्विंटल
10 मिमी स्टील किंमत
58,585 रुपये प्रति क्विंटल
20 मिमी स्टील किंमत
58,590 रुपये प्रति क्विंटल
25 मिमी स्टील किंमत
58,590 रुपये प्रति क्विंटल
सिमेंटच्या किमती
आजचा सिमेंटचा भाव 340 ते 400 रुपये प्रति बॅग आहे. सध्या बाजारात अनेक प्रकारचे सिमेंट उपलब्ध आहे. ज्याचे वेगवेगळे दर आहेत. तुम्ही सिमेंटचे नवीन दर ऑनलाइन पाहू शकता.