Steel and Cement Price : प्रत्येकजण स्वप्नातील घर बांधण्यासाठी दिवसरात्र कष्ट करत असतो. पण घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमती वाढल्याने अनेकांना घर बांधणे शक्य होत नाही. पण सध्या घर बांधणे शक्य आहे. कारण स्टील आणि सिमेंटच्या किमती घसरल्या आहेत.
सध्या घर बांधणाऱ्यांसाठी स्टील आणि सिमेंट खरेदी करण्याची चांगली संधी आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून स्टील आणि सिमेंटच्या दरात कमालीची घसरण होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्टील आणि सिमेंट खरेदी करताना पैशांची बचत होईल आणि कमी खर्चात घर देखील पूर्ण होईल.
गेल्या वर्षी स्टील आणि सिमेंटचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घर बांधणे शक्य नव्हते. मात्र सध्या सर्वसामान्य नागरिक स्वतःचे घर कमी बजेटमध्ये बांधू शकतात.
गेल्या वर्षी स्टीलचे दर 70,000 रुपये प्रति टनाच्या पुढे गेले होते. तर सिमेंटचे दर 400 रुपये प्रति बॅगच्या पुढे गेले होते. घर बांधण्यासाठी स्टील आणि सिमेंट हे दोन घटक खूप महत्वाचे मानले जातात. त्यामुळे या दोन वस्तूंवर जास्त पैसा खर्च होत असतो.
पण सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत स्टील आणि सिमेंटच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. देशातील प्रत्येक राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये स्टील आणि सिमेंटचे वेगवेगळे दर तुम्हाला पाहायला मिळतील.
सध्या स्टील आणि सिमेंटच्या मागणीत घट निर्मण झाली आहे. त्यामुळे त्यांचे दर देखील घसरले आहेत. बांधकाम क्षेत्रात तेजी नसल्याने मागणी देखील कमी आहे. उन्हाळ्यामध्ये स्टील आणि सिमेंटला जास्त मागणी असते. त्यामुळे त्यांचे दर देखील चांगलेच वाढतात.
सिमेंटचे आजचे नवीनतम दर
अल्ट्राटेक सिमेंट 330 रुपये प्रति बॅग
एसीसी सिमेंट 375 रुपये प्रति बॅग
बिर्ला सिमेंट 375 रुपये प्रति बॅग
जे के सिमेंट 390 रुपये प्रति बॅग
दालमिया सिमेंट 410 रुपये प्रति बॅग
जेपी सिमेंट 390 रुपये प्रति बॅग
श्री सिमेंट 350 रुपये प्रति बॅग
प्रिया सिमेंट 330 रुपये प्रति बॅग
स्टीलचे नवीनतम दर
नागपूर महाराष्ट्र TMT 12mm 51500 रुपये प्रति टन
जालना महाराष्ट्र TMT 12 mm 55500 रुपये प्रति टन
मुंबई महाराष्ट्र TMT 12mm 56000 रुपये प्रति टन
चेन्नई तामिळनाडू TMT 12mm 54000 रुपये प्रति टन
दिल्ली दिल्ली TMT 12mm 53800 रुपये प्रति टन