Honda Activa : जर तुम्हीही स्कूटर घेण्याचा विचार करत असाल आणि बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण आता कमी बजेटमध्ये देखील तुम्ही होंडा कंपनीची स्कूटर खरेदी करू शकता. Honda Activa 6G H-स्मार्ट स्कूटर तुम्ही फक्त ९ हजारांमध्ये खरेदी करू शकता.
कंपनीकडून Activa 6G H-स्मार्ट ही स्कूटर नवीन सादर करण्यात आली आहे. या स्कूटरमध्ये अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच लूकही जबरदस्त देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकही या स्कूटरकडे आकर्षित होत आहेत.
Honda Activa 6G H-स्मार्ट मायलेज आणि ब्रेक सिस्टम
या स्कूटरमध्ये तुम्हाला जबरदस्त मायलेज मिळेल. ५० किमी प्रति लिटर इतके मायलेज ही स्कूटर देत आहे. या स्कूटरमध्ये कंपनीकडून कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम मिळते आणि दोन्ही टायरवर ड्रम ब्रेकही उपलब्ध आहेत. स्कूटरमध्ये डिस्क ब्रेकची सुविधा देण्यात आली आहे.
Honda Activa 6G H या स्मार्ट स्कूटरमध्ये 5.3 लीटरपर्यंत इंधन भरले जाऊ शकते. जर तुम्ही या स्कूटरची टाकी फुल भरली तर ही स्कूटर सुमारे २६५ किमीपर्यंत जाऊ शकते.
वैशिष्ट्ये
या स्कूटरमध्ये बूट लाइट, सीट ओपन स्विच, बाह्य इंधन भरणे, तसेच ब्लूटूथ सिस्टम कनेक्टिव्हिटी आहे, यात सटर लॉक आहे, तसेच घड्याळ, स्पीडोमीटर आणि ओडोमीटर दोन्ही अॅनालॉग पद्धतीने दिले आहेत.
किंमत आणि डाउन पेमेंट नंतर EMI
Honda Activa 6G H या स्मार्ट स्कूटरची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 80,537 रुपये आहे. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही ही स्कूटर डाउन पेमेंटवर खरेदी करू शकता. 9,338 रुपये डाउन पेमेंट भरावे लागेल.
यानंतर तुमच्या स्कूटरचे बाकीचे फायनान्स कंपनी भरेल. यानंतर तुम्हाला या फायनान्स कंपनीचे पैसे EMI द्वारे द्यावे लागतील. 36 महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला 2,711 हफ्ता भरावा लागेल.