अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी खरोखर एक चांगली बातमी आहे. खरं तर, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्याला आपली स्वप्ने पूर्ण करण्याची संधी देत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाकडे स्पेशॅलिस्ट केडर ऑफिसर आणि डेप्युटी मॅनेजर हि पदे रिक्त आहेत. भारतीय स्टेट बँक (एसबीआय) मध्ये नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
‘ह्या’ पोस्टसाठी व्हॅकन्सी :- स्पेशलिस्ट केडर ऑफिसर्स (इंजीनियर फायर, नेटवर्क स्पेशलिस्ट, सिक्योरिटी एनालिस्ट, क्रेडिट प्रोसीजर्स, मार्केटिंग, मॅनेजर -क्रेडिट प्रोसीजर) – डेप्युटी मॅनेजर (इंटरनल ऑडिट)
पात्रता :- तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियात या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर वेगवेगळ्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा निश्चित केल्या आहेत. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अधिसूचना व अर्जाचा फॉर्म जारी केला आहे. एसबीआय केअरमध्ये, संबंधित पोस्टच्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला तपशीलवार माहिती मिळू शकते.
असा करा अप्लाय :- एसबीआय वेबसाइट sbi.co.in वर जाऊन किंवा थेट एसबीआय करिअर पेजवर आपण संबंधित पदासाठी अर्ज करू शकता. या पेजवर, लेटेस्ट अनाउंसमेंट्स टॅबवर क्लिक करा, सर्व पोस्टची नोटिफिकेशन आणि एप्लीकेशन लिंक तुम्हाला तिथे मिळेल.
अंतिम तारीख जाणून घ्या :-
ऑनलाइन प्रक्रियेस सुरुवात – 22 डिसेम्बर 2020
अंतिम तारीख – 11 जानेवारी 2021
अर्जात सुधारणा करण्याची अंतिम तारीख – 11 जानेवारी 2021
शुल्क भरण्याची अंतिम तारीख – 11 जानेवारी 2021
अर्जाची प्रिंट घेण्याची अंतिम तारीख – 31 जानेवारी 2021