Car colour in Summer : देशात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे कारने प्रवास करत असताना एसी चालू केल्याशिवाय पर्याय नसतो. उन्हाळ्यात उष्णता वाढते. त्यामुळे तापमान 40 ते 45 अंशांच्या आसपास असते. पण कार घेत असताना त्याचा रंग देखील खूप महत्वाचा असतो.
कारमध्ये जास्त गरम होण्यामागे कारच्या रंगाचा देखील याक भाग असतो. काही विशिष्ट रंगामुळे देखील कारमध्ये अधिक गरम होत असते. पांढरा किंवा हलका रंग सूर्यप्रकाश जलद परावर्तित करतो. दुसरीकडे, काळा किंवा गडद रंग सूर्यप्रकाश अधिक लवकर शोषून घेतात.
पांढऱ्या किंवा सिल्वर रंगाच्या कार कमी प्रकाश शोषून घेतात आणि जास्त परावर्तित करतात. त्यामुळे अशा गाड्यांमध्ये लोकांना जास्त उष्णता जाणवत नाही. त्यामुळे अशा रंगाच्या कार खरेदी करणे कधीही फायद्याचे ठरू शकते.
एसी जास्त चालवल्याने मायलेजवर परिणाम होतो
उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकजण कारमध्ये सतत एसी चालू ठेवत असतात. मात्र एसी चालू केल्याने कारच्या मायलेजमध्ये खूप फरक पडत असतो. काळ्या, तपकिरी, निळ्या किंवा कोणत्याही गडद रंगाच्या कार फक्त ५ टक्के प्रकाश परावर्तित करतात. असे रंग जास्त सूर्यप्रकाश शोषून घेतात.
त्यामुळे अशा रंगाच्या कार उन्हामध्ये चालवणे खूप कठीण होते. त्यामुळे एसी चालू करणे हाच एक उत्तम पर्याय आहे. पण एसी हा कारमधील वातावरण थंड करण्याचा उत्तम पर्याय असला तरी एसीमुळे कारचे मायलेज कमी होते.
पण जर तुम्ही काळ्या, तपकिरी, निळ्या किंवा कोणत्याही गडद रंगाच्या कार खरेदी न करता इतर रंगाच्या कार खरेदी केल्यास तुमचा फायदा होईल. तुमच्या कारमध्ये जास्त उष्णता भासणार नाही तसेच एसीची आवश्यकता पडणार नाही.
गडद रंगाच्या गाड्यांना अपघात होण्याची शक्यता जास्त असते
पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये काळ्या रंगाच्या कारपेक्षा अपघात होण्याची शक्यता १२ टक्के कमी असते. पंधरा, क्रीम किंवा पिवळ्या रंगाच्या कार अधिक सुरक्षित मानल्या जातात. काळ्या रंगाच्या कारचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते.
राखाडी, सिल्वर आणि निळा या रंगाच्या कारचा देखील अपघात होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कार खरेदी करत असताना तुम्हाला योग्य रंगाची निवड करणे गरजेचे आहे.