Car Insurance : नवीन कार घेत असताना सर्व प्रकारचा विमा काढला जातो. यासाठी शोरूम तुमच्याकडून अधिक पैसे घेत असते. पण नवीन कार खरेदी केल्यानंतर जर तिचा अपघात झाला किंवा इतर कोणती समस्या आल्यानंतर विम्याद्वारे सर्वकाही नुकसान मोफत दिले जाते.
पण कार घेत असताना तुम्ही देखील विम्याचे पैसे वाचवू शकता. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्ही विम्याचे पैसे वाचवू शकता. चला तर जाणून घेऊया…
योग्य कार विमा निवडा
दिवसेंदिवस नवीन कार घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कंपन्यांना दिवसेंदिवस अधिक वाहने निर्मिती करावी लागत आहेत. पण कार खरेदी करत असताना तुम्हाला विमा काढून दिला जातो.
पण तुम्ही कोणता आणि कसला विमा काढत आहेत हे पाहत नसाल तर तुम्ही मोठी चूक करत आहात. कारण कार खरेदी करत असताना योग्य विमा निवडणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या कारची किंमत देखील कमी होऊ शकते.
थर्ड पार्टी इन्शुरन्स
कार खरेदी करण्यासोबतच लोकांनी कारचा विमा काढणेही आवश्यक आहे. अपघात झाल्यास कारचे झालेले नुकसान विम्याद्वारे भरून काढता येते. दुसरीकडे, जर तुमच्या कारचा विमा नसेल, तर दंडही लागू केला जाऊ शकतो. अशा स्थितीत थर्ड पार्टी इन्शुरन्स मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
गरजेनुसार पॉलिसी निवडा
कोणताही विमा निवडत असताना त्याची पूर्ण माहिती घ्या. तुम्ही नेहमी तुमच्या गरजेनुसार पॉलिसी निवडावी. ज्यांच्याकडून तुम्ही कार विकत घेत आहात त्यांच्यामार्फत तुम्हाला अनेक पॉलिसी सांगितल्या जातील आणि त्या तुम्हाला महागडी पॉलिसी घेण्यासाठी प्रेरितही करू शकतील.
परंतु सर्वप्रथम तुम्हाला तुमची गरज आणि पॉलिसीमध्ये कोणते कव्हरेज मिळत आहे, हे पाहावे लागेल. बघा, तरच तुम्ही स्वस्त, चांगली आणि कमी प्रीमियम असलेली योग्य पॉलिसी निवडू शकाल. तसेच विविध विम्यांची माहिती करून घ्या.
सर्वसमावेशक विमा पॉलिसी
नवीन कार घेत असताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण जर तुम्ही विमा योग्य निवडला नाही तर तुम्हाला नुकसान होऊ शकते. विमा घेत असताना तुम्ही सर्वसमावेशक मोटर विमा पॉलिसी घेऊ शकता.
या पॉलिसी अंतर्गत, पूर, भूकंप, वादळ यांसारख्या आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीचे कव्हरेज देखील मिळू शकते. ही पॉलिसी अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असेल. जर तुम्ही सर्वसमावेशक मोटर विमा पॉलिसी घेतली तर तुमचाच फायदा होईल.