अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- जगभरात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना भारतात देखील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३ हजारांच्या वर गेली आहे.
वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नवीन नियमांनुसार, आता भारतात आल्यावर,
सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल तसेच आठव्या दिवशी त्यांची RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
केंद्राची ही मार्गदर्शक तत्त्वे 11 जानेवारीपासून लागू होणार आहेत. या नियमावलीनुसार परदेशातून, विशेषत: ओमायक्रॉनचा धोका असलेल्या
देशांच्या यादीत समाविष्ट देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांच्याहोम क्वारंटाईनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच, त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्हि किंवा निगेटिव्ह आल्यास पुढील कार्यवाहीच्या पद्धतीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात नियमावली जारी केली आहे