Chanakya Niti : चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनाबद्दल अनके तत्वे सांगितली आहेत. त्या तत्वांचा आजही मानवाला मोठा उपयोग होता आहे. मानवी जीवन यशस्वी बनवण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये करिअर, मैत्री, वैवाहिक जीवन, संपत्ती आणि महिलांशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या धोरणांचा अवलंब केल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये पैसा, प्रगती, विवाह, मैत्री, शत्रुत्व आणि व्यापार इत्यादी समस्यांवर उपाय सांगितले आहेत. तसेच पुरुषांनी त्यांच्या पत्नीला कधीही या गोष्टी सांगू नयेत असा उल्लेख त्यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये केला आहे.
तुमची कमजोरी
आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की पुरुषांनी महिलांना त्यांची कधीही कमजोरी सांगू नये. अशा गोष्टी नेहमी पुरुषांनी गुपित ठेवाव्यात. जर तुमच्या कमजोरी पत्नीला समजल्या तर ती सतत तुमच्या कमजोरीवरून तुम्हाला बोलून दाखवेल. तसेच तुमची कमजोरी दाखवून देईल.
स्वतःचा अपमान
चाणक्यांनी सांगितले आहे की पुरुषांनी त्यांच्या पत्नीला स्वतःच्या झालेल्या अपमानाबद्दल कधीही सांगू नका. जर तुम्ही असे केल्यास तुमची पत्नी सतत तुम्हाला तेच बोलून दाखवेल.
देणगी दिलेले
तुम्हीही कधीही दिलेले दान कोणालाही सांगू नका. दान केलेले तुम्ही गुपित ठेवा. याबद्दल पत्नीला कधीही सांगू नका. जर तुम्ही दान केलेले पत्नीला सांगितले तर त्याचे महत्व कमी होते. तसेच तुमच्या अशा खर्चाबद्दल ती सतत तक्रारी करू शकते.
तुमची कमाई
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, तुम्ही तुमच्या कमाईबद्दल पत्नीला कधीही सांगू नये. जर तिला तुमच्या कमाईची माहिती मिळाली तर ती त्यावरही अधिकार दाखवून तुमचे सर्व खर्च थांबवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे काही वेळा आवश्यक कामांवरही परिणाम होऊ शकतो.