Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी धोरणे आजही मानवी जीवनात तंतोतंत उपयोगी पडत आहेत. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवी जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत. त्याचा मानवी जीवनात आजही मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे.
तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी देखील चाणक्य नितीमध्ये चाणक्यांनी अनेक मार्ग सांगितले आहेत. तसेच आर्थिक दृष्ट्या मजबूत होण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टींपासून दूर राहावे लागेल. तसेच काही चुकीची कामे देखील तुम्हाला आर्थिक दृष्ट्या प्रबळ होण्यापासून रोखू शकतात असे चाणक्यांनी सांगितले आहे.
घरामध्ये अनेकदा आर्थिक समस्या निर्माण होत असतात. चाणक्यांच्या मते याला कारणीभूत तुम्ही स्वतः आहात. कारण घरामध्ये वावरताना तुम्ही अनेक चुकीची कामे करत असता त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते असे चाणक्य सांगतात.
दैनंदिन जीवनात तुम्ही जाणूनबुजून किंवा नकळत अनेक चुकीच्या गोष्टी करत असता. त्यामुळे धनाची देवी लक्ष्मी माता क्रोधीत होते. त्यामुळे जीवनात पैशाची कमतरता निर्माण होत असते.
कोणाचाही अपमान करू नका
आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितले आहे की, जीवनात कधीही कोणाचाही अपमान करू नका. इतरांशी वागताना आणि बोलताना नम्रपणाने वागा. जो व्यक्ती वडील, विद्वान, महिला किंवा गरिबांचा छळ करतो किंवा अपमान करतो, त्याच्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही.
स्वयंपाकघरात खराब भांडी ठेवू नका
तुम्हीही रात्री जेवण केल्यानंतर खराब भांडी स्वयंपाक घरात ठेवत असाल तर लवकरच सावध व्हा. कारण अशी जेवण झाल्यनानंतरची खराब भांडी स्वयंपाक घरामध्ये ठेवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण अशी भांडी ठेवल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि तुमच्या घरात पैशांची कमतरता भासते.
विनाकारण पैसे खर्च करू नका
तुमच्याकडे पसे आहेत आणि तुम्ही ते पैसे विनाकारण कुठेही खर्च करत असाल तर असे करू नका. कारण अनावश्यक खर्च केल्याने माता लक्ष्मी क्रोधीत होते. त्यामुळे अनावश्यक खर्च करणाऱ्या लोकांवर माता लक्ष्मी नाराज होते.
संध्याकाळी घर झाडू नका
यासोबतच आचार्य चाणक्य सांगतात की, संध्याकाळी कधीही घर झाडू नये. कारण संध्याकाळी लक्ष्मी घरात येते. त्यावेळी तिला घरात किंवा घराच्या दारात घाण दिसली तर ती परत जाते. त्यामुळे अशी कामे करणे नेहमी टाळा.