भारत

Chanakya Niti : सावधान! अशा मुलींशी लग्न करणे ठरू शकते धोकादायक, जाणून घ्या त्यामागील कारण

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मानवी जीवनासंबंधी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच स्त्री आणि पुरुषांना सुखी संसार करण्यासाठी चाणक्यांनी धोरणे आजही मानवाला चांगलीच उपयोगी पडत आहेत. चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये अशा मुलीशी लग्न धोकादायक असल्याचे सांगितले आहे.

मानवाच्या कठीण काळात चाणक्यांनी धोरणे खूप मदत करतात. चाणक्यांनी त्यांच्या या ग्रंथामध्ये स्त्री, पुरुष, आई, वडील आणि मुलांसाठी अनेक उपयोगी तत्वे सांगितली आहेत. मानवी जीवनात आजही ही तत्वे वापरली जातात. लग्न करत असताना अनेक गोष्टी पाहूनच ते केले पाहिजे असे चाणक्य सांगतात.

लग्नाबद्दल चाणक्याच्या मोठ्या गोष्टी

चाणक्य नीती या ग्रथांच्या पहिल्या अध्यायाच्या १४ व्या श्लोकात लिहले आहे की, नीच कुटुंबात जन्मलेल्या सुदर मुलीशी लग्न न करता मानवाने कुलीन कुटुंबात जन्मलेल्या कुरूप मुलीशीही लग्न करावे असे चाणक्यांनी सांगितले आहे.

अनेकदा लग्न करत असताना मुलगी पाहायला गेल्यानंतर तिची सुंदरता पाहिली जाते. पण तिची सुंदरता पाहत असताना त्यांच्या कुटूंबातील गुणांकडे दुर्लक्ष केले जाते. पण असे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. नीच कुटुंबातील मुलीची संस्कृती देखील खालावलेली असू शकते.

या कुटुंबातील मुलीची बोलण्याची, उठण्याची तसेच वागण्याची पद्धतही वेगळी असेल. तिच्या कुटुंबप्रमाणेच त्या मुलीचीही वागणूक असू शकते. त्यामुळे कुरूप असली चांगल्या कुटुंबातील मुलीशी लग्न करणे फायद्याचे ठरू शकते.

आचार्य चाणक्य यांच्या मते, उच्च कुटुंबातील मुलगी तिच्या कृतीने तिच्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाढवते, तर नीच कुटुंबातील मुलगी तिच्या वागण्याने कुटुंबाची प्रतिष्ठा कमी करते. स्वतःच्या सारख्या कुळात लग्न करणे केव्हाही योग्य आहे.

चाणक्यांच्या मते, एखाद्या नीच माणसाकडे चांगले गुण किंवा चांगले ज्ञान असले तर ते त्याच्याकडून नक्कीच घेतले पाहिजे. पण त्याच नीच माणसाकडे इतर वाईट गुण किंवा वाईट प्रवृत्ती असेल तर ती कधी स्वीकारू नये.

त्या नीच माणसाकडून तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात म्हणजे तुमचा फायदाच आहे. पण त्याच्या वाईट गुणांचा कधीही तुम्ही विचार करू नका. त्याचा अशा गुंणापासून नेहमी चार हात लांब राहा.

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा आहार दुप्पट, बुद्धी चौपट, धैर्य सहा पट आणि लैंगिक इच्छा आठ पट आहे. आचार्यांनी या श्लोकातून स्त्रीची अनेक वैशिष्ट्ये उलगडून दाखवली आहेत. या स्त्रीच्या अशा बाजू आहेत, ज्यावर लोकांची नजर सहसा जात नाही.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts