भारत

Chanakya Niti : पुरुषांच्या या गुणांकडे महिला लगेच होतात आकर्षित, जाणून घ्या सविस्तर

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी मानवी जीवनाबद्दलची अनेक धोरणे चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितली आहेत. त्या धोरणांचा अवलंब केल्यास मानव नक्कीच यशस्वी होईल. तसेच मानवाला यशस्वी होण्यासाठी देखील चाणक्यांनी अनेक मार्ग सांगितले आहेत.

चाणक्य नीती या शास्त्रामध्ये चाणक्यांनी महिला आणि पुरुषांच्या नात्याबद्दल अनेक तत्वे सांगितली आहेत. जी फार कमी लोकांना माहिती आहेत. महिला नेहमी पुरुषांच्या काही गुणांकडे आकर्षित होत असतात याचाही उल्लेख चाणक्यांनी केला आहे.

महिला किंवा पुरूष जीवनसाथी निवडत असताना अनेक गोष्टींचा विचार करत असतात. मात्र काही पुरुषांकडे महिला लगेच आकर्षित होत असतात. त्यांच्याकडे काही विशिष्ट गुण असतात त्यामुळे महिलांना हे गुण फार आवडत असतात.

‘यथा चतुर्भि: कनक परिक्ष्यते, निसर्गछेदंतपतदानै:
तथा चतुर्भिः पुरुषः परिक्ष्यते, श्रुतेन शीलेन गुणेन कर्माना ।

या श्लोकात आचार्य चाणक्य आदर्श माणसाचे गुण आणि सवयी याच्याबद्दल सांगितले आहे. जो माणूस प्रामाणिक आहे, चांगली वागणूक देणारा आणि चांगला श्रोता असे पुरुष महिलांना अधिक आवडत असतात.

महिलांनाही हे पुरुष खूप आवडतात. म्हणूनच, जर तुम्हाला आयुष्यात कोणत्याही स्त्रीला तुमच्याकडे आकर्षित करायचे असेल, तर तुम्हाला बोलण्याची पद्धत दुरुस्त करावी लागेल.

प्रामाणिकपणा

आचार्य चाणक्य यांनी जो पुरुष आपल्या पत्नी आणि मैत्रिणीशी प्रामाणिक असतो आणि इतर महिलांकडे स्वच्छ नजरेने पाहतो असे पुरुष महिलांना नेहमी आवडत असतात. स्त्रीचा आदर करणारे पुरुष महिलांना नेहमी आकर्षित करत असतात.

शांत वर्तन

ज्या व्यक्तीमध्ये शांत, साधे आणि सौम्य स्वभावाचे गुण असतात अशा पुरुषांकडे महिला लगेच आकर्षित होत असतात. स्त्रीला तिचा जीवनसाथी शांत स्वभावाचा हवा असतो. शांत आणि संयमित पुरुष महिलांना नेहमी आवडतात.

समृद्ध व्यक्तिमत्व

आचार्य चाणक्य म्हणतात की स्त्रिया सौंदर्यापेक्षा व्यक्तिमत्त्वाला अधिक प्राधान्य देतात. जर एखाद्या पुरुषामध्ये हा गुण असेल तर स्त्रीया त्याच्याकडे अधिक आकर्षित होत असतात. प्रामाणिक आणि कष्टाळू पुरुष पाहून स्त्रियांचे हृदय लवकर नरमते .

व्यवस्थित बोलणारे आणि समजून घेणारे पुरुष

स्त्रियांना नेहमी त्यांचे म्हणणे ऐकून घेणारा आणि त्यांच्याशी शांत आणि संयमाने बोलणारे पुरुष आवडत असतात. त्यामुळे स्त्रिया नेहमी अशा पुरुषांच्या शोधात असतात. शांत आणि संयमाने बोलणाऱ्या पुरुषांकडे महिला नेहमी आकर्षित होत असतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts