भारत

Chandrayaan-3 : संपूर्ण जगाच्या नजरा चंद्रावर का आहेत? चंद्रावर दडलंय तरी काय? जाणून घ्या सविस्तर

Chandrayaan-3 : संपूर्ण जगाच्या चंद्रावर नजरा आहेत. तसेच चंद्रावर जाण्यासाठी प्रत्येक देशाची धरपड सुरु आहे. आज भारताचे चांद्रयान ३ या यानाने अवकाशात यशस्वी झेप घेतली आहे. भारताकडून हे यां चंद्रावर तेथील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी सोडण्यात आले आहे.

भारताकडून चंद्रावर यान पाठवण्यासाठी या अगोदरही प्रयत्न करण्यात आला होता मात्र शेवटच्या क्षणी रोव्हरचा संपर्क तुटून ती मोहीम अयशस्वी झाली होती. आता पुन्हा एकदा भारताकडून चांद्रयान ३ चंद्रावर पाठवले आहे.

रशिया, अमेरिका, चीन, जपान, युरोपियन स्पेस एजन्सीसह संपूर्ण जगाचे लक्ष चंद्राकडे लागले आहे. सर्वांनाच चंद्रावर बेस कॅम्प तयार करायचा आहे. भारताचे चांद्रयान ३ हे यां चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून तेथील पुरावे गोळा करणार आहे.

सोव्हिएत रशिया, अमेरिका आणि चीन यांनी चंद्रावर यशस्वी मोहिमा पाठवल्या आहेत. तर अनेक देशांनी चंद्रावर अनेक मोहीम पाठवल्या आहेत मात्र त्या अयशस्वी झाल्या आहेत. चंद्रावर नक्की दडलंय तरी काय? सर्वांच्या नजरा चंद्राकडे का लागल्या आहेत? कला तर जाणून घेऊया…

सौरमालेच्या उत्पत्तीबद्दल माहिती उपलब्ध होईल

अमेरिकडून चंद्रावर पहिली मोहीम यशस्वी करण्यात आली होती. अपोलो हे अमेरिकेची पहिली मोहीम चांद्रवर यशस्वीरीत्या पार पडली होती. अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल टाकले होते.

१९६९ ला नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल टाकले होते. आता तुम्हाला वाटत असेल की नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर टाकलेले पहिले पाऊल कसे असेल? मात्र चंद्रावर असे कोणतेही वातावरण नाही ज्यामुळे हे पाऊल मिटून जाऊ शकते.

4 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा आपली सूर्यमाला तयार झाली तेव्हा सर्व ग्रह आणि उपग्रहांवर सर्व लघुग्रह आणि उल्का पिंडांचा पाऊस पडत होता, ज्यामुळे सर्व ग्रह आणि उपग्रहांवर सर्व प्रकारचे खड्डे किंवा कुंड तयार झाले होते.

उल्का पिंड पृथीवर देखील पडल्याने पाणी आणि सूक्ष्म जीवही आले. त्यामुळे पृथीवर जीवसृष्टीचा विकास झाला आहे. त्यामुळे पृथ्वीवर वातावरण बदल आणि इतर प्रक्रिया सुरु होऊ लागली.

परंतु चंद्रावर कोणतेही वातावरण नाही, त्यामुळे सूर्यमालेच्या सुरुवातीचे सर्व पुरावे त्याच्या पृष्ठभागावर आहेत. त्यामुळे जर आपण चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करू शकलो तर आपल्याला सौरमालेच्या उत्पत्तीबद्दल माहिती मिळू शकेल.

खोल अंतराळ अभ्यास करण्यास मदत होईल

चंद्रावरील वातावरणाचा शोध घेण्यासाठी आणि सूर्यमालेच्या सुरुवातीचे सर्व पुरावे गोळा करण्यासाठी चंद्रावर जाण्याची धरपड सर्व जग करत आहे. चंद्राचा अभ्यास करून, शास्त्रज्ञांना वैश्विक किरणोत्सर्गाचा आणि चंद्रासारख्या वातावरण नसलेल्या ग्रहांवर लहान कणांचा पाऊस यांचा काय परिणाम होतो हे शोधून काढता येते आणि त्यामुळे शास्त्रज्ञांना अंतराळातील पुढील मोहिमांसाठी समजून घेण्यास मदत होते.

हरित ऊर्जेसह अनेक आर्थिक फायदे

नासा आणि इस्रोने चंद्राच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर बर्फाचा शोध लावला आहे. त्यामुळे येत्या काळात चंद्रावर मानवी वस्तीची आशा निर्माण झाली आहे. पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रेणूंनी बनलेले असल्याने, ते तोडून वातावरणात ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो असा शास्त्रज्ञांकडून दावा करण्यात आला आहे. मात्र चंद्रावर मानवाला राहणे शक्य होणार नाही. कारण द्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या केवळ 1/6 असल्याने सामान्यपणे माणूस राहू शकणार नाही.

चंद्रावर अनेक प्रकारची खनिजे असल्याचा दावा देखील शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मानवी तंत्रज्ञानाच्या विकासकामासाठी तेथील खनिजे महत्वाची ठरू शकतात. पृथ्वीवर हेलियम-3 आहे मात्र ते खूपच कमी प्रमाणात आढळते. मात्र चंद्रावर ते भरपूर प्रमाणात आहे.

जर आपण ते पृथ्वीवर आणू शकलो, तर फ्यूजन प्रक्रियेद्वारे, त्यातून भरपूर ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि ती हरित ऊर्जेचा एक चांगला स्त्रोत बनू शकते. त्यामुळे येत्या काळात त्याचा मानवाला मोठा फायदा होऊ शकतो.

भारताकडून चांद्रयान-३ मध्ये अनेक तांत्रिक सुधारणा केल्या

भारताने २०१९ मध्ये चांद्रयान दोन ही मोहीम आखली होती. मात्र शेवटच्या काही खासनी त्या मोहिमेचा संपर्क तुटून ती अयशस्वी झाली होती. मात्र आता चांद्रयान तीन या आजच्या मोहिमेमध्ये चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यासाठी ऑर्बिटरऐवजी प्रोपल्शन मॉड्यूलचा वापर केला जाणार आहे. याशिवाय लँडरमध्ये विविध तांत्रिक सुधारणाही करण्यात आल्या आहेत, त्यामुळे यशस्वी सॉफ्ट लँडिंग होण्याची दाट शक्यता आहे.

प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत इस्रोचे माजी प्रमुख के सिवन म्हणाले की, गेल्या वेळी चांद्रयान-2 मध्ये ज्या उणिवा होत्या, त्यामुळे आम्ही सॉफ्ट लँडिंग करू शकलो नाही, त्या दूर करण्यात आल्या आहेत, त्यामुळे दक्षिणेकडे लँडिंगची ही बाब आहे. चंद्राचा ध्रुव शक्यता मजबूत आहेत.

चांद्रयान-३ बद्दल बोलताना इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनीही प्रसारमाध्यमांना सांगितले की, चांद्रयान-२ च्या तुलनेत यावेळी आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत ज्यामुळे आपण चंद्रावर यशस्वी लँडिंग करू शकू.

जर असे झाले तर भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश बनेल. आतापर्यंत यूएसएसआर, अमेरिका आणि चीनने चंद्रावर यशस्वी मोहिमा पाठवल्या आहेत परंतु त्यापैकी कोणीही दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts